अश्वजीतची चौकशी नाही, कारही गायब…, प्रिया सिंहचे पोलिसांवरच गंभीर आरोप

मुंबई तक

अश्वजित गायकवाडवर त्याची गर्लफ्रेंड प्रिया सिंगने आपल्याला कारने चिरडून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप तर केला आहेच, मात्र त्याच बरोबर आता तिने पोलिसांवरही संशय व्यक्त केला आहे. अश्वजीतने मला ठार मारण्याचा प्रयत्न करूनही त्याची का चौकशी केली जात नाही असा सवाल आता तिने उपस्थित केला आहे.

ADVERTISEMENT

Ashwajit Gaikwad tried to kill Priya Singh was not investigated car case also disappeared
Ashwajit Gaikwad tried to kill Priya Singh was not investigated car case also disappeared
social share
google news

Thane Crime : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (MSRDC) संचालकांचा मुलगा अश्वजीत गायकवाडवर (Ashwajit Gaikwad) त्याची गर्लफ्रेंड प्रिया सिंगने (Priya Singh) आपल्याला कारने चिरडून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. अश्वजीत हा भाजप युवा मोर्चाचा अध्यक्षही आहेत. त्यामुळे आता प्रिया सिंगने या प्रकरणी पोलिसांच्या तपास कार्यावरच गंभीर सवाल उपस्थित केले आहेत.

पोलिसांचा दबाव

प्रिया सिंहने सांगितले की, काल रात्री काही पोलीस माझ्याकडे आले होते, त्यावेळी त्यांनी आपल्याला कागदावर सही करण्याची जबरदस्ती केली होती. मात्र त्यावेळी माझ्याकडे वकील नसल्याने मी त्याच्या सही करण्यासाठी नकार दिला, व त्यावेळी माझ्या घरचेही माझ्यासोबत कोणी नव्हते. मात्र पोलीस माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत होते असा गंभीर आरोपही तिने केला आहे. तुम्हाला काही विचार करायचा असेल तो तुम्ही उद्या करा मात्र आज सही करा असा तगादा पोलिसांनी लावला होता असंही प्रिया सिंहने सांगितले. तरीही मी सही केली नसल्यामुळे पोलीस रागाने तिथून निघून गेले.

अद्याप चौकशी का नाही

यावेळी प्रिया सिंह म्हणाली की, माझा पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांवर प्रचंड विश्वास आहे. कारण या प्रकरणात मला फक्त न्याय हवा आहे. तर या प्रकरणी पोलीस आयुक्त जय जीत सिंग यांनी सांगितले की, या प्रकरणात अश्वजीत अनिल गायकवाड आणि इतरांवर गुन्हा दाखल करून त्यांनाही आरोपी करण्यात आले आहे. अश्वजीतची अद्याप चौकशी करण्यात आली नसून कारही गायब आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. यासाठी लागणारे फॉरेन्सिक पुरावेही गोळा केले जात असून गुन्हा करण्यासाठी आलेल्या प्रत्येक गोष्टींचा तपास करून त्यांच्यावर कलम लावण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

हे ही वाचा >> ‘OBC विरोधात बोलणाऱ्यांचा…’, छगन भुजबळांचा थेट इशारा

सोशल मीडियावर व्यथा मांडली

प्रिया सिंहने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत सांगितले आहे की, ‘माझा उजवा मोडला आहे. त्यामुळे माझी शस्त्रक्रिया झाली. पायामध्ये रॉडही बसवावा लागला आहे. या दुर्घटनेमुळे सगळ्या शरीरावर जखमा झाल्या आहेत. माझ्या हातावर, पाठीवर आणि पोटावर खोल जखमा झाल्या असून आता मला किमान 3 ते 4 महिने अंथरुणावरच पडून राहावे लागणार आहे. त्यानंतर 6 महिने चालण्यासाठी आधार घ्यावा लागेल अशी खंतही तिने व्यक्त केले. त्यातच माझ्या कमाईवर माझं कुटुंब चालत असून मी आता काम करू शकणार नसल्याचेही तिने म्हटले आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp