महिलेला विवस्त्र करून मारहाण : पत्नीवर गुन्हा दाखल होताच सुरेश धसांची मोठी मागणी
मी राजकारणात गेल्या 25 वर्षापासून काम करतो आहे. त्यामुळे समाजात माझी काय पत आहे हे जगजाहीर आहे. आता दाखल झालेला गुन्हा हा खोटा असून त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे तथ्य नसल्याचे आमदार सुरेश धस यांनी सांगितले.
ADVERTISEMENT
MLA Suresh Dhas: सोशल मीडियावर आमदार सुरेश धस यांच्या पत्नी आणि अन्य दोघांकडून आदिवासी महिलेला विवस्त्र करुन मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल (Video Viral) होताच महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली. या घटनेमुळे आमदार धस यांच्यावर जोरदार टीका होऊ लागली आहे. त्यामुळे आता या प्रकरणाची पोलिसांनी सखोल चौकशी करुन हे प्रकरण फॉरेन्सिक लॅबकडे (Forensic Lab) तपासासाठी द्यावी अशी मागणी करत त्याबाबत त्यांनी खुलासा केला आहे.
ADVERTISEMENT
महिलेला केले विवस्त्र
बीड जिल्ह्यातील वाळुंज (ता. आष्टी) मध्ये जमीन ताब्यात घेण्याच्या वादावरन एका आदिवासी महिलेला आमदार सुरेश धस यांच्या पत्नीसह अन्य दोघांनी विवस्त्र केल्याची घटना घडली. त्यानंतर या प्रकरणी त्या महिलेने आमदार धस यांची पत्नी प्राजक्ता यांच्यासह अन्य तिघांवर विनयभंग आणि ॲट्रोसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता याप्रकरणी आमदार सुरेश धस यांनी खुलासा करत या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
हे ही वाचा >> दारुसाठी पैसे मागितले, नकार देताच केली शरीराची चाळण
पोलिसांसमोरच घडली घटना
आदिवासी महिलेला विवस्त्र करण्याची घटना 15 ऑक्टोबर रोजी पोलिसांसमोरच घडली होती. अशी तक्रार त्या महिलेकडून करण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियावरुन व्हायरल झाल्यानंतर धस यांच्या कुटुंबीयावर जोरदार टीका करण्यात आली.
हे वाचलं का?
गोरगरीबांच्या जमिनी ताब्यात
या प्रकरणी आदिवासी महिलेने पोलिसात तक्रार दाखल करताना म्हटले आहे की, प्राजक्ता धस यांचा जमीन हडपण्याचा धंदा आहे. त्या नेहमीच गोरगरीबांच्या जमिनी ताब्यात घेतात अशीही तक्रार त्यांनी पोलिसात दिली आहे. त्यामुळे प्राजक्ता धस यांच्यासह यांच्यासह रघू पवार, राहुल जगदाळे या तिघांवर विनयभंग आणि अॅट्रॉसिटी कायद्यानुसार आष्टी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तिला चांगला चोफ द्या
आदिवासी महिलेकडून धस यांच्याविरोधात तक्रार देताना त्यामध्ये असंही नमूद करण्यात आले आहे की, रघू कैलास पवार, राहुल माणिक जगदाळे या दोघाकडून पती आणि सुनेसमोरच मला विवस्त्र केले होते. त्या दोघांकडून हा प्रकार चालू असतानाच तुम्ही घाबरू नका तिला चांगला चोफ द्या असंही त्या म्हणत होत्या अशी तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे आता या प्रकरणाची शहानिशा करुन पोलिसांनी कसून चौकशी करावी अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी केली आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Ajit Pawar: ‘एकदा होऊनच जाऊ द्या…’, अजित पवारांची प्रचंड मोठी मागणी, भाजपलाच गाठलं खिंडीत?
माझी पत जगजाहीर
आमदार सुरेश धस यांच्याकडून खुलासा करताना ते म्हणाले की, मी गेल्या 25 वर्षापासून राजकारणात काम करतो आहे. त्यामुळे माझी काय पत आहे हे जगजाहीर आहे. त्यामुळे या प्रकरणी दाखल झालेला गुन्हा हा खोटा आहे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे तथ्य नाही, म्हणून पोलिसांनी या घटनेची सखोल चौकशी करावी. या घटनेतील व्हिडीओ आणि गुन्ह्याची सखोल चौकशी फॉरेन्सिक लॅबच्या माध्यमातून करावी अशीही मागणी त्यांनी केली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT