Baba Siddique : बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडणाऱ्यांची सगळी कुंडलीच आली बाहेर, एक तर भंगारवाला...
Baba Siddique Death News : महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी सहा आरोपींची ओळख पटली आहे. यापैकी आतापर्यंत तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
धर्मराज कश्यप आणि गुरमेल सिंग यांच्यासोबतचा तिसरा शूटर फरार
आतापर्यंत समोर आलेला बाबा सिद्दीकींच्या हत्येचा घटनाक्रम
आतापर्यंत समोर आलेला बाबा सिद्दीकींच्या हत्येचा घटनाक्रम
Baba Siddique Death News : महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी सहा आरोपींची ओळख पटली आहे. यापैकी आतापर्यंत तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. बाबा सिद्दीकी यांची शनिवारी त्यांच्या कार्यालयाबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले. (baba siddique murder accused background scrap workers dharmaraj kashyap pravin lonkar gurmail singh)
ADVERTISEMENT
या प्रकरणात, पोलिसांनी घटनास्थळावरून धर्मराज कश्यप आणि गुरमेल बलजीत सिंग या दोन मारेकऱ्यांना अटक केली. त्यानंतर पोलिसांनी तिसरा आरोपी प्रवीण लोणकर यालाही अटक केली.
प्रवीण लोणकर हा शुभम लोणकर याचा भाऊ आहे. शुभम लोणकरने सोशल मीडियावर लॉरेन्स बिश्नोई टोळीच्यावतीने बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली होती. शिवकुमार गौतम, मोहम्मद जीशान अख्तर आणि शुभम लोणकर हे तीन आरोपी फरार अजूनही फरार आहेत.
हे वाचलं का?
हेही वाचा : Mumbai Tak Chavadi : 'बाळासाहेबांनी राणेंना दिलेला 'हा' शाप', भास्कर जाधवांनी हे काय सांगितलं...
धर्मराज कश्यप आणि गुरमेल सिंग यांच्यासोबतचा तिसरा शूटर फरार
शिवकुमार गौतम हा अजूनही फरार असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. तर, मोहम्मद जीशान अख्तर हा बाबा सिद्दिकींच्या हत्येचा मास्टरमाईंड असल्याचा पोलिसांचा समज आहे.
आतापर्यंत समोर आलेला बाबा सिद्दीकींच्या हत्येचा घटनाक्रम
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी संध्याकाळी धर्मराज, शिवकुमार आणि गुरमेल सिंग हे तिघं वांद्र्यातील बाबा सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर पोहोचले. त्यानंतर त्यांनी बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार केला.
ADVERTISEMENT
मुंबई पोलिसांनी सांगितले की, आरोपींकडे मिरची स्प्रे देखील होता. जो त्यांना बाबा सिद्दीकींवर वापरायचा होता, परंतु शिवकुमारने थेट गोळीबार सुरू केला. यावेळी एपीआय राजेंद्र दाभाडे यांनी धर्मराज आणि गुरमेल या दोन आरोपींना पकडले, तर शिवा तेथून पळून जाण्यात यशस्वी झाला.
ADVERTISEMENT
आरोपींबद्दलची माहिती
धर्मराज आणि शिवकुमार हे दोघेही उत्तर प्रदेशचे रहिवासी आहेत, तर गुरमेल हरियाणातील कैथल येथील रहिवासी आहे. त्याचबरोबर या घटनेचा मास्टरमाइंट मानला जाणारा झीशान अख्तर हा पंजाबमधील जालंधरचा रहिवासी आहे.
गुरमेलच्या आजीने प्रसारमाध्यमांना सांगितले की, त्याचे आई-वडील मरण पावले आहेत आणि आता त्यांचे त्यांच्याशी कोणतेही नाते नाहीये. तीन महिन्यांपूर्वी तो तुरुंगातून जामिनावर बाहेर आला होता, मात्र तो घरी राहत नसल्याचे त्यांनी सांगितले.
त्याचवेळी, शिवकुमार आणि धर्मराज हे उत्तरप्रदेशचे रहिवासी आहेत, त्यांचा कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नव्हता. शिवकुमारच्या आईने सांगितले की, तो पुण्यात एका भंगारच्या दुकानात कामाला गेला होता आणि होळीला शेवटचा गावी आला होता.
कैसरगंज सर्कल ऑफिसर अनिल कुमार सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिव कुमार काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रात मजूर म्हणून आला होता आणि तेव्हाच त्यांची भेट धर्मराजसोबत झाली होती.
कोण आहे मोहम्मद जीशान अख्तर?
जालंधरचा रहिवासी असलेला मोहम्मद जीशान अख्तर हा पटियाला तुरुंगात बंद होता. त्याच्यावर सात गुन्हे दाखल आहेत. सूत्रांनी सांगितले की तुरुंगात तो लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या कार्यकर्त्यांच्या संपर्कात आला, ज्यांनी त्याला बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचे कंत्राट दिले होते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, झीशान अख्तर या वर्षी 7 जून रोजी तुरुंगातून बाहेर आला होता. यानंतर तो हरियाणातील कैथलमध्ये गुरमेलला भेटायला गेला. मग त्यांनी शिवा, धर्मराज आणि गुरमेलसाठी मुंबईत खोलीची व्यवस्था केली. बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर अख्तरही मुंबईतच असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्याचे शेवटचे लोकेशन मुंबईत सापडले असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT