Badlapur: 'अक्षय शिंदेचं 4 महिन्यापूर्वीच दुसरं लग्न झालेलं, पहिली बायको...', समोर आली नवी माहिती

दिव्येश सिंह

ADVERTISEMENT

'अक्षय शिंदेचं 4 महिन्यापूर्वीच दुसरं लग्न झालेलं, पहिली बायको...'
'अक्षय शिंदेचं 4 महिन्यापूर्वीच दुसरं लग्न झालेलं, पहिली बायको...'
social share
google news

बातम्या हायलाइट

point

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी नवी माहिती

point

आरोपी अक्षय शिंदेंच्या शेजाऱ्यांनी दिली नवी माहिती

point

चार महिन्यांपूर्वी अक्षय शिंदेचं झालेलं दुसरं लग्न

बदलापूर: ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील शाळेतील दोन चिमुकल्या मुलींच्या लैंगिक अत्याचार प्रकरणी अटकेत असलेला आरोपी अक्षय शिंदे याने दोनदा लग्न केले होते, आरोपीच्या पहिल्या पत्नीने त्याच्या वाईट सवयींना कंटाळून त्याला सोडून दिले होते, त्यानंतर आरोपी अक्षय शिंदे नुकतेच म्हणजेच चार महिन्यांपूर्वी दुसरे लग्न केले होते. (badlapur akshay shinde got married 4 months back his first wife left him after getting fed up with his habits shocking information given by neighbors)

ADVERTISEMENT

बदलापूरमधील आरोपी अक्षय शिंदेच्या शेजाऱ्याशी आमचे प्रतिनिधी दिव्येश सिंह यांनी जेव्हा संवाद साधला, तेव्हा त्यांनी अक्षय शिंदेबाबत अनेक धक्कादायक खुलासे केले.

हे ही वाचा>> Badlapur School Case: 'हे सगळं...', आरोपी अक्षय शिंदेच्या आई-वडिलांचा खळबळजनक आरोप

अक्षय शिंदे ज्या परिसरात राहत होता तो संपूर्ण परिसर या घटनेनंतर हादरून गेला आहे, आरोपी आपल्या परिसरात राहत होता हे सांगणंही लज्जास्पद वाटत असल्याची भावना येथील नागरिकांनी व्यक्त केली. दरम्यान, नाव न सांगण्याच्या अटीवर आरोपीच्या शेजाऱ्याने सांगितले की, 'अक्षयचे नुकतेच लग्न झाले असून तो भाऊ आणि आईसोबत राहत होता, सुमारे 4 महिन्यांपूर्वीच त्याचे लग्न झाले होते. हे त्याचे दुसरे लग्न होते, त्याची पहिली पत्नी त्याच्या सवयी आणि त्यांच्यातील घरगुती वादामुळे त्याला सोडून गेली होती.'

हे वाचलं का?

'5 वर्षांपासून आरोपींचे कुटुंब या परिसरात राहत होते'

दरम्यान, त्या शेजाऱ्याने असंही सांगितलं की, 'गेल्या काही दिवसांपासून अक्षयची दुसरी पत्नी देखील त्यांच्या घरात दिसत नव्हती. त्याचं नेमकं कारण मात्र माहित नाही. पण गेल्या 5 वर्षांपासून आरोपी अक्षय आणि त्याचं कुटुंब हे या परिसरात राहत होतं. यापूर्वी आरोपी दुसऱ्या भागात राहत होता, मात्र महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्याची झोपडपट्टी पाडली, त्यामुळे आरोपीचे कुटुंब येथे आले. असा राक्षस या परिसरात, आमच्यामध्ये राहत, याचा विचारही कुणी केला नव्हता.' असं म्हणत अक्षयच्या शेजाऱ्याने प्रचंड संताप व्यक्त केला.

हे ही वाचा>> लाडकी बहिणीचे पैसे नको, आम्हाला सुरक्षाच द्या: बदलापुरातील महिलांची मागणी

'त्या' घटनेनंतर कुटुंबीय गेले घर सोडून 

अक्षय शिंदेला अटक केल्यानंतर कुटुंबीयांनी तात्काळ परिसर सोडलं आणि घराला कुलूप लावून ते कुठे तरी निघून गेले. दरम्यान, बुधवारी संतप्त लोकांनी आरोपीच्या घराची तोडफोड केली. शिंदे याला बुधवारी दुसऱ्यांदा पोलीस कोठडीसाठी न्यायालयात हजर करण्यात आले होते. ज्यानंतर न्यायालयाने 26 ऑगस्टपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावली होती. त्याचबरोबर आयजी आरती सिंह यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेली एसआयटी देखील आता या प्रकरणाचा तपास करत आहे. विशेष तपास पथकाने बदलापूर पोलिसांकडून हा तपास हाती घेतला आहे.

ADVERTISEMENT

पोलिसांनी कोणत्या कलमांखाली कारवाई केली?

पोलिसांनी आरोपी अक्षय शिंदे याच्यावर लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायदा आणि कलम 65 (2) (12 वर्षांखालील मुलीवर बलात्कार), 74 (विनयभंग करण्याच्या उद्देशाने प्राणघातक हल्ला) या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT