Badlapur News: "आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही" अक्षय शिंदे असं म्हणाला अन्... 'त्या' व्हॅनमध्ये काय घडलं?

मुंबई तक

Akshay Shinde: The exact information about what actually happened before the encounter with Akshay Shinde, the accused in the Badlapur incident, has now come to light. Know what exactly is mentioned in the FIR.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

अक्षय शिंदे याचा पोलीस चकमकीत झाला मृत्यू

point

अक्षय शिंदेने गोळीबार करण्याआधी काय म्हटलं?

point

पोलिसांसोबत अक्षय शिंदेने नेमकं काय केलेलं?

Akshay Shinde Encounter: ठाणे: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा काल (23 सप्टेंबर) पोलीस व्हॅनमध्येच झालेल्या चकमकीत मृत्यू झाला. ज्याचा एफआयआर आता समोर आला आहे. आपल्या मुलाचा एन्काउंटर हा फेक असल्याचा आरोप अक्षय शिंदेच्या कुटुंबीयांनी केला आहे. तर त्यावेळी नेमकं काय झालं याबाबतचा एफआयआर समोर आला आहे. ज्यामध्ये आरोपी अक्षय शिंदेने पोलिसांवर बंदुकीने हल्ला चढवल्याचं म्हटलं आहे. (badlapur sexual assault case i will not leave anyone alive now said akshay shinde and fired shots what exactly happened in that van)

"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", असं म्हणत अक्षय शिंदेने तीन गोळ्या झाडल्या असल्याचं एफआयआरमध्ये म्हटलं आहे. अक्षय शिंदे याचा ज्या संजय शिंदे यांनी एन्काउंटर केला त्यांनी या सगळ्या प्रकरणी पोलिसात एफआयआर दाखल केला आहे. ज्यामध्ये अक्षय शिंदेने गोळीबार करण्याआधी नेमकं काय केलं आणि काय म्हटलं हे देखील सांगितलं आहे.

हे ही वाचा>> Badlapur News: आधी पोलिसांवर गोळीबार अन् नंतर अक्षय शिंदेचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", एन्काउंटरच्या आधी अक्षय शिंदे काय म्हणाला? 

First Information contents (प्रथम खबर हकीकत ) :

मी संजय रामचंद्र शिंदे, (वय 57 वर्ष) मी सन 1992 पासुन महाराष्ट्र पोलीस दलात नोकरीस असुन दि. 03/09 / 2024 पासुन मध्यवर्ती गुन्हे शाखा, ठाणे शहर येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणुन कार्यरत आहे. मी बदलापुर पूर्व पोलीस ठाणे गु.र.नं. 409/2024, भा.द.वि.स.क. 377, 324, 504, 506 या गुन्ह्याचे तपासकामी मा. पोलीस आयुक्त, ठाणे शहर यांच्या आदेशाने स्थापन करण्यात आलेल्या विशेष पथकात काम करीत असुन सदर गुन्ह्याचा मी तपासी अधिकारी आहे.

बदलापुर पुर्व पोलीस ठाणे गु.र.नं. 380 / 2024 या गुन्ह्यात तळोजा मध्यवर्ती कारागृह येथे न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी अक्षय शिंदे हा आमचेकडे तपासावर असलेल्या वर नमुद गु.र.नं. 409 / 2024 या गुन्ह्यात पाहिजे आरोपी असल्याने त्याचा ताबा मिळणेसाठी मा. जिल्हा व अतिरीक्त सत्र न्यायालय, 7 कल्याण यांच्याकडुन दि. 20/09/2024 रोजी ताबा वॉरन्ट घेण्यात आले होते.

हे वाचलं का?

    follow whatsapp