Crime: पिंपरीतील कुख्यात गुंड बाळा वाघेरेला पोलिसांनी घरातून उचललं, नेमकं प्रकरण काय?
Bala Waghere Arrest : पिंपरी चिंचवडमधील कुख्यात गुंड बाळा वाघेरेला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्या राहत्या घरातून त्याला पोलिसांनी अटक (Arrest) केली आहे. एका व्यावसायिकाला मारहाण करुन खंडणी मागितल्याप्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. बाळा वाघेरेसह त्याच्या दोन्ही साथीदारांना देखील पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी व्यावसायिकाच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल केला आहे. (Bala Waghere, a […]
ADVERTISEMENT
Bala Waghere Arrest : पिंपरी चिंचवडमधील कुख्यात गुंड बाळा वाघेरेला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्या राहत्या घरातून त्याला पोलिसांनी अटक (Arrest) केली आहे. एका व्यावसायिकाला मारहाण करुन खंडणी मागितल्याप्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. बाळा वाघेरेसह त्याच्या दोन्ही साथीदारांना देखील पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी व्यावसायिकाच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल केला आहे. (Bala Waghere, a notorious gangster in Pimpri, is in chains in the case of beating and extortion)
ADVERTISEMENT
काय आहे प्रकरण?
याबाबत अधिक माहिती अशी की, या व्यापाऱ्याची वाल्हेकरवाडी येथील वाघेरेचा साथिदार हरीश चौधरीसोबत आर्थिक व्यवहार झाला होता. मात्र ते पैसे व्यापाऱ्याने परत केले तरी चौधरी आणखी पैसे मागत होता. ते देण्यास व्यापाऱ्याने नकार दिला. म्हणून त्याचं अपहरण करून त्याला बाळा वाघरेच्या घरी आणलं गेलं. त्याला मारहाण करण्यात आली. बाळा आप्पा वाघेरे, हरीश चौधरी आणि राहून उणे या तिघांनी त्या व्यावसायिकाला मारहाण केली.
PUNE: कोयता खरेदीसाठी आधार कार्ड बंधनकारक, पुणे पोलिसांची अनोखी शक्कल
हे वाचलं का?
व्यावसायिकाने सुटका करुन थेट पोलिस स्टेशन गाठले
पैसे आणून देतो म्हणून व्यापाऱ्याने तिथून कशीबशी सुटका करून घेतली. बाहेर निघताच थेट चिंचवड पोलीस स्टेशन गाठलं. पोलिसांनी व्यावसायिकाच्या तक्रारीवरुन वाघेरेला काही कळण्याआधी त्याच्या घरातून त्याला बेड्या ठोकल्या. त्याचबरोबर अन्य दोन आरोपी, हरीश चौधरी, राहून उणे यांना देखील पोलिसांनी अटक करुन गजाआड केले आहे. बाळा वाघेरेवर या आधी अपहरण, खंडणीसह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.
पुणे आणि पिंपरी चिंचवड गुन्हेगारीच्या विळख्यात
मागील काही दिवसांपासून पिंपरी चिंचवड शहर परिसरात एकहाती गुन्हेगारी सत्ता गाजवणाऱ्या बाळा वाघेरेच्या घरात घुसून त्याला बेड्या ठोकल्याने गुन्हागारी विश्वात खळबळ माजली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात अनेकदा गँगवार पाहायला मिळाला आहे. मागील काही दिवसांपासून कोयता गँग भर रस्त्यात दहशत माजवत आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. या घटनांमुळे परिसरात दहशतीचं वातावरण आहे. अशात या कुख्यात गुंडाच्या मुसक्या आवळल्याने गुन्हेगारी विश्वात काहीप्रमाणात चाप बसू शकते.
ADVERTISEMENT
अजित पवारांनी मुद्दा मांडताच पोलीस ॲक्शनमध्ये; 12 तासांत कोयता गँगच्या आवळल्या मुसक्या
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT