सोनूसोबत अफेयर, मोनूला बोलवून केला मर्डर...दीरामुळे वहिणी का बनली गुन्हेगार?

मुंबई तक

एका पत्नीने प्रियकराच्या मदतीने आपल्या नवऱ्याचा क्रूर अंत केला आहे. नवरा सतत बाहेरगावी रहात असल्याने बायको आनंदी नव्हती. याच दरम्यान तिचे अनैतिक संबंध जुळले.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
google news

बातम्या हायलाइट

point

सोनूसोबत अफेयर, मोनूला बोलवून केला मर्डर

point

दीरामुळे वहिणी का बनली गुन्हेगार?

Crime News : एका महिलेने प्रियकरासोबत मिळून तिच्या नवऱ्याला अतिशय क्रूरपणे संपवले आहे. विश्वास आणि प्रेमावर टिकलेल्या या नात्याचा असा भयानक शेवट होईल, असे कोणालाही वाटले नव्हते.  धक्कादायक म्हणजे, फक्त दीड वर्षांपूर्वीच या महिलेचा प्रेमविवाह झाला होता. उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यातील ही घटना आहे. आरोपी महिलेचा प्रियकर दुसरा तिसरा कोणी नसून तिचा दीरच आहे.

दीड वर्षांपूर्वी प्रेमविवाह

आधी पत्नीने साप चावून पतीचा मृत्यू झाल्याची बतावणी केली, मात्र पोलिस तपासात वेगळीच माहिती समोर आली. पोलिसांनी केलेल्या चौकशीत पतीचा मर्डर केल्याची माहिती पत्नीने दिली. मृत पती हा दोनच दिवसांपूर्वी गुजरातमधील सुरतहून घरी आला होता. दीड वर्षांपूर्वी या दोघांचा प्रेमविवाह झाला होता.

हे ही वाचा : कार वॉशर वडिलांसोबत उच्चभ्रू सोसायटीत गेली, अन् UPSC ची तयारी करणाऱ्या तरुणीची बलात्कार करुन हत्या

'त्या रात्री साप चावला'

बांदा जिल्ह्यातील जामू नावाच्या गावात 5 एप्रिल रोजी सकाळी सोनू नावाच्या एका 22 वर्षीय युवकाचा ट्युबवेलमध्ये मृतदेह सापडला होता. त्याच्या मृत्यूच्या आदल्या रात्री सोनू पत्नी निशासोबत झोपला असताना त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळावरुन मृतदेह ताब्यात घेऊन पोस्ट मार्टमसाठी पाठवला. मृताच्या पत्नीने सर्वांना सांगितले की, तिच्या नवऱ्याचा मृत्यू साप चावल्याने झाला. मात्र साक्षीपुरावे आणि पोस्ट मार्टमनंतर ही हत्या असल्याचे स्पष्ट झाले. मृताच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरु केला. पत्नी निशाला ताब्यात घेऊन तिला पोलिसी खाक्या दाखवताच भयानक प्रकार समोर आला.

हे ही वाचा : गोड बोलून हॉटेलमध्ये बोलावलं, अन् 25 वर्षीय तरुणीचे 16 वर्षीय तरुणासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध

'मी नवऱ्यासोबत आनंदात नव्हते'

आरोपी पत्नीने सांगितले की, माझे पती सोनू दोन दिवसांपूर्वी सुरत वरुन आले होते. दीड वर्षांपूर्वी आम्ही प्रेम विवाह केला होता. मात्र सोनी कायमच बाहेर रहात होते. त्यामुळे मी माझ्या नवऱ्यासोबत आनंदी नव्हते. याच दरम्यान माझे मोनू सोबत नाते जुळले. आम्हा दोघांना लग्न करायचं होतं. सोनूला ही माहिती कळताच त्यांनी विरोध केला. त्यामुळे त्यांना आमच्या मार्गावरुन दूर करण्याचा निर्णय घेतला. त्यादिवशी मी नवऱ्यासोबत झोपायला गेले. रात्री संधी मिळताच मी मोनूला बोलवून घेतले. दोघांनी मिळून नवऱ्याचा गळा दाबून त्यांची हत्या केली.

हे वाचलं का?