Crime : अल्पवयीन मुलीवर शिक्षकाचा तीन महिन्यांपासून अत्याचार, बीड हादरलं!

मुंबई तक

ADVERTISEMENT

beed crime news11-year-old girl molested by Maulana for three months shocking incident in Beed
शिक्षकाने 11 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

बीड जिल्ह्यात हादरवून टाकणारी घटना

point

अल्पवयीन मुलीवर शिक्षकाचा अत्याचार

point

शिक्षक तब्बल तीन महिन्यापासून करत होता अत्याचार

Beed Crime News : बीड जिल्ह्यातून एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. या घटनेत एका शिक्षकाने 11 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे.  धक्कादायक बाब म्हणजे तब्बल तीन महिन्यापासून हा संपूर्ण प्रकार सूरू होता. या घटनेची माहिती मुलीने आई वडिलांना दिल्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी आता पालकांनी तत्काळ बीड पोलीस ठाणे गाठून नराधम शिक्षकाविरोधात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून उशिरा रात्री नराधम शिक्षकाला अटक केली आहे. (beed crime news 11 year old girl molested by masjid moulana for three month shocking incident beed) 

मिळालेल्या माहितीनुसार, पेठ बीड पोलीस ठाणे हद्दीतील मोमीनपुरा भागात एका धार्मिक शिक्षण संस्थेत शिक्षण घेण्यासाठी एक अल्पवयीन मुलगी मौलानाच्या घरी जायची. यावेळी शिकवणी घेणाऱ्या शिक्षकाने तिच्यावर अत्याचार केला. तब्बल तीन महिन्यापासून मुलीसोबत हा घाणेरडा प्रकार सूरू होता. या दरम्यानच्या काळात तिने कुठेही या घटनेची वाच्यता केली नव्हती. अखेर या अत्याचाराला कंटाळून त्या मुलीने आपल्या आई वडिलांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर आई वडिलांनी पोलीस ठाणे गाठून नराधम शिक्षका विरोधात तक्रार दाखल केली होती. या घटनेनंतर तत्काळ पोलिसांनी आरोपीला अटक करत गुन्हा दाखल केला आहे. 

हे ही वाचा : Eknath Shinde : ''मुख्यमंत्री' हा शब्द काय जड...'', लाडकी बहिणवरून शिंदेंच्या मंत्र्याने अजित पवार गटाला सुनावलं

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिडीत मुलीवर लैंगिक अत्याचार तिच्या उर्दुच्या शिक्षकाने केला आहे. त्यानंतर मौलानाला अटक केली आहे.फिर्यादी आणि तिच्या आईला पोलीस स्टेशनला बोलवले आहे.तसेच शांतता समितीचे सदस्य बोलवून व्हिडिओ रेकॉर्डिंग करत जबाब नोंदवला आहे.पीडित मुलगी ही अल्पवयीन आहे. लैंगिक अत्याचार करण्यापूर्वी इतर मुलांना बाहेर पाठवायचा आणि मुलीवर अत्याचार करत असे.  मुलीची वैद्यकीय तपासणी केली असून आरोपीस अटक केली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे 'इतर' योजना बंद?

    follow whatsapp

    ADVERTISEMENT