बीडमध्ये आकाचा आणखी एक 'आका' तयार; तरुणाला जनावरासारखं सोललं, जीवाच्या आकांतानं...

पंकजा मुंडे

Beed Crime : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अमानुषपणे मारहाण करत हत्या करण्यात आली. देशमुख हत्या प्रकरणानंतर वाल्मिक कराडचा निकटवर्तीय गोट्या गित्तेच्या टोळीने तरुणाला मारहाण केली.

ADVERTISEMENT

Beed Crime News Walmik Karad Closest Gotya Gitte
Beed Crime News Walmik Karad Closest Gotya Gitte
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अमानुषपणे मारहाण करत हत्या करण्यात आली.

point

बीडमधील कायदा आणि सुव्यवस्थेवर अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

point

देशमुख हत्या प्रकरणानंतर वाल्मिक कराडच्या निकटवर्तीय गोट्या गित्तेच्या टोळीने तरुणाला मारहाण केली.

Beed Crime News : बीड जिल्ह्यात काही महिन्यांपूर्वी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना अमानुषपणे मारहाण करत हत्या करण्यात आली. त्यानंतर बीडमधील कायदा आणि सुव्यवस्थेवर अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. या घटनेला काही महिने उलटताच बीडमध्ये गुन्ह्यांच्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. यानंतर कुख्यात गुंड असणाऱ्या गोट्या गित्तेसोबत इतर काही आरोपींवर मकोका लावण्यात आला आहे. अशातच गोट्याचा साथीदार असणाऱ्या 10 ते 12 जणांच्या टोळीने परळी वैजनाथ तालुक्यातील लिंबूटा येथील शिवराज दिवटे याचा खून करण्याच्या उद्देशाने त्याला बेदम मारहाण केली आहे. या प्रकरणामुळे संतोष देशमुख प्रकरणाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. 

हे ही वाचा : रस्त्यात न्यूड होऊन बकरीवाल्यासोबत अश्लील चाळे, पॉर्न साइट्सला Video विकणाऱ्या तरुणीचं A टू Z कांड!

या प्रकरणातील मुख्य सूत्रधार हा आदिनाथ उर्फ गोट्या गित्ते असल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित आरोपी हा वाल्मिक कराड आणि गोट्या गित्तेचा निकटवर्तीय असल्याची माहिती समोर आली आहे. शिवराजचा खून करण्याच्या उद्देशाने त्याला परळीतील टाकेवाडी येथे आणले आणि त्याला जनावरासारखी मारहाण केली. या प्रकरणाचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या कृत्याने पुन्हा बीड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

या आरोपींना तात्काळ पोलिसांनी ताब्यात घेऊन मकोका अंतर्गत कारवाईची मागणी केली आहे. तसेच शिवराज दिवटेच्या कुटुंबियांनीही गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली. याच प्रकरणात सकल मराठा समाजानेही गुन्हेगारांना कठोर शिक्षेबाबत मागणी केली आहे. दरम्यान, वाल्किम कराड आणि गोट्या गित्ते हे निकटवर्तीय असल्याची माहिती समोर आली आहे.  

हे ही वाचा : बीडच्या आकाच्या आकाचा आणखी एक आका तयार; तरुणाला जनावरासारखं सोललं, जीवाच्या आकांतानं... 

गोट्या गित्ते आणि वाल्किम कराडचे एकत्रित फोटो समोर आले आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये देशाला हादरवून टाकणाऱ्या अशा घटना घडत आहेत. या घटनेनंतर बीडचे पालकमंत्री अजित पवार यावर नेमकी काय भूमिका घेतील? असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp