Bhaynder Crime : मुलींना आंघोळ करताना खिडकीतून बघायचा, आईने शक्कल लढवून...; तरूणाचं पुढे काय झालं?

मुंबई तक

ADVERTISEMENT

bhaynder crime news mother caught red hand accuse by installing cctv outside house daughter molesters
आरोपी मुलींचा सतत पाठलाग करायचा.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

भायंदरमधून धक्कादायक घटना समोर

point

मुलींना अंघोळ करताना पाहायला

point

आईने शक्कल लढवून आरोपीला केले जेरबंद

Bhaynder Crime News : बदलापूरमधील लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर राज्यात एका मागून एक बलात्काराच्या घटना उघडकीस येत आहेत. असे असतानाच आता भाईंदरमधून एक घटना समोर आली आहे. या घटनेत घरात मुली अंघोळ करत असताना एक तरूण दररोज डोकावायचा. तरूणाच्या या कृत्यानंतर मुली घरातच असुरक्षित वाटायचं. त्यामुळे मुलींनी याबाबत आपल्या आईला माहिती दिली होती. त्यानंतर आईने शक्कल लढवत पोलिसांमार्फत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहे. त्यामुळे नेमकी ही घटना काय आहे? हे जाणून घेऊयात. ( bhaynder crime news mother caught red hand accuse by installing cctv outside house daughter molesters) 

ADVERTISEMENT

भाईंदर पश्चिमेला एक महिला आपल्या दोन अल्पवयीन मुलींसोबत राहत होती. मागील दोन महिन्यांपासून याच परिसरात राहणारा आरोपी मुलींचा सतत पाठलाग करायचा. आई घरात नसताना खिडकीतून लपून मुलींना आंघोळ करताना बघायचा. त्यामुळे मुलींना आपल्याच घरात सुरक्षित वाटत होते. तसेच त्या प्रचंड घाबरल्या होत्या. 

हे ही वाचा : Marathi Classical Language : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, पण काय-काय फायदे मिळणार?

या घटनेनंतर मुलींनी आपल्या आईकडे याबाबतची तक्रार केली होती. या तक्रारीनंतर महिलेने स्थानिक मनसे कार्यकर्त्यांची भेट घेऊन याबाबतची माहिती दिली. परंतू या घटनेचा महिलेकडे पुरावा नव्हता. त्यामुळे महिलेने  या गोष्टीची खात्री पटावी म्हणून आपल्या घराबाहेर सीसीटीव्ही कॅमेरे लावले. त्यावेळी आरोपी घरात डोकावत असल्याचा दिसून आला. त्यामुळे महिलेने हा पुरावा दाखवताच मंगळवारी रात्रीच्या वेळी मनसे कार्यकर्त्यांनी त्याला पकडून चांगलाच चोप दिला आणि भाईंदर पोलीस ठाण्यात नेले.

हे वाचलं का?

या प्रकरणी पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून आरोपीवर बालकांच्या लैगिक शोषण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली. आरोपी हा खासगी रुग्णालयात कामाला असून याबाबत तपास सुरु असल्याची माहिती भाईंदर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रफुल्ल वाघ यांनी दिली. या घटनेचा अधिक तपास सूरू आहे.

हे ही वाचा : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा, विधानसभेपूर्वी मोदींचा मोठा निर्णय

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT