Marathi Classical Language : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, पण काय-काय फायदे मिळणार?
Classical Language Marathi: Marathi has got the status of classical language and now let's know in detail what its benefits will be.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा

केंद्र सरकारने दिली मंजुरी, विधानसभा निवडणुकीआधी मोठा निर्णय

अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने काय फायदा होणार?
मुंबई: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीआधी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा अत्यंत महत्त्वाचा निर्णय केंद्रातील मोदी सरकारने घेतला आहे. पण अभिजात भाषेचा दर्जा म्हणजे नेमकं काय?, अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्या तर काय फायदा होतो?, भारतात आतापर्यंत कोण-कोणत्या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. हे सगळं आपण सविस्तरपणे जाणून घेऊया. (marathi got the status of classical language but what benefits will it get)
आतापर्यंत कोणकोणत्या भाषांना मिळालाय अभिजात भाषेचा दर्जा?
अभिजात भाषेचा दर्जा भारतात 2004 मध्ये तामिळ, 2008 मध्ये कन्नड, 2013 मध्ये मल्ल्याळम, 2008 मध्ये तेलुगू, 2014 मध्ये ओडिया, 2005 मध्ये संस्कृत भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे.
आता मराठीसोबत पाली, बंगाली, आसामी आणि प्राकृतला देखील अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे.
हे ही वाचा>> मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा, विधानसभेपूर्वी मोदींचा मोठा निर्णय
अभिजात भाषेचा दर्जा कधी मिळतो? यासाठी 2014 मध्येच राज्यसभेत केंद्रीय सांस्कृतिक विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार काही मार्गदर्शक तत्व आहेत, काही निकष आहेत, ते पूर्ण केले तरच अभिजात भाषेचा दर्जा मिळतो.