मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा, विधानसभेपूर्वी मोदींचा मोठा निर्णय
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून होत होती. अखेर या मागणीकडे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लक्ष देत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. केंद्र सरकारचा हा निर्णय मराठी भाषिकांना प्रोत्साहन देणारा आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा

मराठीसोबत पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय
केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून होत होती. अखेर या मागणीकडे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लक्ष देत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. केंद्र सरकारचा हा निर्णय मराठी भाषिकांना प्रोत्साहन देणारा आहे. (central government annouced classical language status to marathi langauge)
केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली आहे. या बैठकीत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारने मराठी भाषेसह आणखी पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. मराठी सोबत पाली, बंगाली, आसामी आणि प्राकृतला देखील अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाने मराठी भाषा सातासमुद्रापार जगभरात आणखी प्रभावीपणे पोहोचणार आहे.
हे ही वाचा : Mazi Ladki Bahin: ऑक्टोबर महिन्यात थेट मिळणार 3000 रुपये, 'हे' आहे खरं कारण!
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या या निर्णयानंतर राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया समोर येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. मराठी ही भारताची शान आहे. या अभूतपूर्व भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल अभिनंदन. हा सन्मान आपल्या राष्ट्राच्या इतिहासात मराठीच्या समृद्ध सांस्कृतिक योगदानाची कबुली देतो. मराठी हा नेहमीच भारतीय वारशाचा आधार राहिला आहे, असे मोदी यांनी एक्सवर म्हटलंय.