Crime: नगरसेवकाला बाथरुममध्ये बोलावलं अन् गुप्तांगच कापून टाकलं, डॉक्टर महिलेने सगळ्यांना हादरवलं!

मुंबई तक

ADVERTISEMENT

bihar lady doctor cut politician private part betrayed in love shocking crime story
एका लेडी डॉक्टरने (Women Doctor) एका नगरसेवकाचे प्रायव्हेट पार्ट (Private Part) कापल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
social share
google news

Crime News : प्रेम प्रकरणातून धोका मिळण्याच्या आतापर्यंत अनेक घटना घडल्या आहेत. या घटनेचे अनेकदा गुन्ह्यातही रूपांतर झाले आहे. आता अशीच एक घटना समोर आली आहे. या घटनेत एका लेडी डॉक्टरने (Women Doctor) एका नगरसेवकाचे प्रायव्हेट पार्ट (Private Part) कापल्याची धक्कादायक घटना घडली आहे.नेमकं या लेडी डॉक्टरने असं का केले? आणि ही संपूर्ण घटना काय आहे? हे जाणून घेऊयात.  (bihar lady doctor cut politician private part betrayed in love shocking crime story)

बिहारच्या छपरामध्ये ही घटना घडली आहे. या घटनेत लेडी डॉक्टर असलेल्या महिलेचे नाव अभिलाषा कुमारी आहे. या महिलेच्या घरी नगरसेवक वेद प्रकाश आला होता. या दरम्यान दोघांमध्ये काही मिनिटे चर्चा झाली. या चर्चेनंतर लेडी डॉक्टर नगरसेवकाला ज्यूस प्यायला देऊन अंघोळी करण्यासाठी बाथरूममध्ये निघून गेली होती. 

हे ही वाचा : 'मी कोणताही पक्ष बदललेला नाही', अजित पवार अचानक असं का म्हणाले?

अंघोळी करत असताना लेडी डॉक्टरने नगरसेवकाला बाथरूममध्ये बोलावून घेतले आणि चाकूने त्याचा प्रायव्हेट पार्टच कापून टाकला होता. डॉक्टर इतक्यावरच थांबली नाही तर तिने त्याचा प्रायव्हेट पार्ट फ्लश देखील करून टाकला होता. या घटनेनंतर रक्तबंबाळ अवस्थेत नगरसेवक बाथरूममधून बाहेर पडला. अशा अवस्थेत नगरसेवक घराबाहेर देखील पडू शकत नव्हता. म्हणून तो डॉक्टरच्याच घरात बिछान्यावर व्हिव्हळत पडला होता. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

लेडी डॉक्टरला ज्यावेळेस या गोष्टीचा पछतावा झाला त्यावेळेस तिने तात्काळ पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन नगरसेवकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. तसेच लेडी डॉक्टरने घटनेची कबुली दिल्याने तिला ताब्यात घेण्यात आले होते. 

लेडी डॉक्टरने गुप्तांग का छाटलं? 

लेडी डॉक्टर अभिलाषा यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार,  अभिलाशाचे गेल्या दोन वर्षापासून नगरसेवक असलेल्या वेद सोबत अफेयर सुरु होते. या अफेयर दरम्यान लग्नाचे आमीष दाखवून वेदने अनेकदा अभिलाषा सोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते. या दरम्यान ती प्रेग्नेंट देखील राहिली होती. मात्र नगरसेवकाने तिला दोनदा अबॉर्शन करण्यास भाग पाडले होते. तसेच अभिलाषा ज्या ज्या वेळेस लग्नाचा विषय काढायची, त्या त्या वेळेस नगरसेवक विषय टाळायचा. 

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Team India: 'आली रे आली टीम इंडिया आली', जंगी स्वागतासाठी दणक्यात तयारी!

दरम्यान या अफेअरची माहिती अभिलाषाच्या कुटुंबियांना कळताच त्यांनी तिच्यावर लग्नासाठी दबाव टाकायला सुरूवात केली. या दबावानंतर अभिलाषाने देखील पुन्हा नगरसेवकावर लग्नासाठी दबाव टाकला. या दबावानंतर नगरसेवक कसा बसा तयार झाला होता. त्यानुसार 30 तारखेला कोर्ट मॅरीज करायचे ठरले होते. 

ADVERTISEMENT

अभिलाषाने या लग्नाची जोरदार तयारी सूरू केली होती. मात्र लग्नाच्या दिवशी नगरसेवक कोर्टात पोहोचलाच नाही. त्याचा मोबाईल देखील बंद होता. त्यामुळे नेहमीप्रमाणे नगरसेवकाने तिला धोका दिला होता. त्यामुळे अभिलाषाला नगरसेवक आपला वापर करत असून धोका देत असल्याचे कळून चुकले होते. त्यामुळेच या गोष्टीचा बदला घेण्यासाठी अभिलाषाने नगरसेवकाचे गुप्तांग छाटल्याची पोलिसांसमोर कबुली दिली. 

या प्रकरणात आता पोलिसांनी लेडी डॉक्टर हिला अटक केली आहे. आणि नगरसेवक वेदला पटना मेडीकल कॉ़लेजमध्ये उपचारासाठी पाठवले आहे.सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस करीत आहेत.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT