Dalip Tahil Case : एक चूक अन् अभिनेत्याला तुरुंगवासाची शिक्षा, 2018 चं प्रकरण काय?
दलीप ताहिल यांना दोन महिन्याची तुरुंगवासाची शिक्षा न्यायालयाने सुनावण्यात आली आहे. कारण दारू पिऊन कार चालवल्यामुळे रिक्षाला उडवून महिला आणखी एकाला जखमी केल्याप्रकरणी त्याना ही शिक्षा देण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
Dalip Tahil : बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते (Bollywood Actor) दलीप ताहिल सध्या वेगळ्याच एका कारणामुळे चर्चेत आले आहेत. अनेक चित्रपट, टीव्ही शो आणि थिएटर प्रोडक्शनमधून त्यांनी अनेक भूमिका गाजवल्या आहेत. त्यांच्या वेगवेगळ्या भूमिकांमुळे ते नेहमीच चर्चेत राहिले आहेत. मात्र आता प्रमुख भूमिकांसाठी ओळखल्या जाणाऱ्या दलीप यांच्यासाठी न्यायालयाने (Court) एक धक्कादायक निकाल दिला आहे. या 65 वर्षीय अभिनेत्याला 5 वर्षे जुन्या प्रकरणात 2 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा (imprisonment) सुनावण्यात आली आहे. त्यामुळे ते आता चर्चेत आले आहेत.(bollywood actor dalip tahil jailed for two months drunk and drive case car hits rickshaw)
दारुच्या नशेत कार उडवली
दलीप ताहिल त्यांच्या भूमिकांमुळे नेहमीच त्यांची चर्चा केली जाते. यावेळी मात्र त्यांची वेगळ्याच कारणामुळे चर्चा केली जात आहे. दारू पिऊ गाडी चालवल्याप्रकरणी (Drunk and Drive) दलीप ताहिलला न्यायालयाकडून दोन महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. हे प्रकरण आहे 2018 मधील. त्यांनी त्यावेळी दारुच्या नशेत असताना त्यांनी ऑटोरिक्षाला धडक दिली होती. त्या अपघातात एक महिलाही जखमी झाली होती. त्यामुळे त्याप्रकरणी त्यांना दोषी धरुन त्यांना 2 महिन्यांच्या कारवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
हे ही वाचा >> Pune : पुण्यातील रस्त्यावर थरार! मद्यधुंद बसचालकाने उलटी पळवली बस, 15 वाहनांना उडवले
महिलाही झाली गंभीर जखमी
दलीप ताहिलवर 2018 मध्ये दारू पिऊन गाडी चालवण्याचा आणि हिट-अँड-रन प्रकरणाचा आरोप लावण्यात आला होता. त्याला दारू पिऊन गाडी चालवल्याबद्दल आणि ऑटोरिक्षाला धडक दिल्याबद्दल अटक करण्यात आली होती. त्या अपघातात तरुण आणि महिला जखमीही झाल्या होत्या. त्या अपघातातील पीडितांनी अभिनेत्याविरुद्ध एफआयआर दाखल केला होता.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ताहिलचा अपघातग्रस्तांवरच हल्ला
अपघातानंतर दलीप ताहिलने पीडितांवर प्राणघातक हल्ला केल्याचा आरोपही लावण्यात आला होता. ही घटना घडल्यानंतर लगेचच या अभिनेत्याला मुंबईतील खैर पोलीस ठाण्यात अटक करण्यात आली होती. त्यावेळी त्याची जामिनावरही सुटका करण्यात आली होती.
हे ही वाचा >> Maratha Reservation : जरांगेंचा अल्टिमेटम संपण्याआधीच शिंदे सरकारची जाहिरात, मुद्दा चिघळणार?
अनेक भूमिका गाजलेल्या
दलीप ताहिल हे त्यांच्या भूमिकांसाठी नेहमीच चर्चेत असतात. त्यांच्या विशेषतः नकारात्मक भूमिका अनेकांच्या पसंदीला उतरल्या होत्या. 1990 च्या दशकातील ते एक प्रसिद्ध अभिनेते होते, ज्यांनी बाजीगर, कयामत से कयामत तक, राजा, इश्क, यासारख्या सुपडूपर चित्रपटातून त्यांनी आपल्या कामातून प्रेक्षकांच्या हृदयावर छाप सोडली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT