तरुणीसोबत लॉजमध्ये गेला व्यापारी, नंतर रुममध्ये मृतदेहच मिळाला… नेमकं काय घडलं?
Crime: दिल्लीत एक 24 वर्षीय तरुणीसोबत लॉजमध्ये गेलेला व्यापाऱ्याचा गूढरित्या मृत्यू झाला असून सोबत असणारी मुलगी मात्र बेपत्ता झाली आहे. याबाबत दिल्ली पोलीस सध्या अधिक तपास करत आहेत.
ADVERTISEMENT
Businessman Deadbody found in lodge: नवी दिल्ली: राजधानी दिल्लीत एक धक्कादायक घटना घडली आहे. शनिवारी एका लॉजमध्ये (Lodge) एका व्यावसायिकाचा मृतदेह (Deadbody) सापडल्याची घटना घडली आहे. उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील एका व्यावसायिकासोबत एक तरूणी (Young Lady) लॉजमध्ये राहण्यासाठी आली होती. पण दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी (2 मार्च) सकाळी लॉजच्या रुममध्येच व्यावसायिकाचा मृतदेह सापडला. ही घटना दिल्लीतील सफदरजंग एन्क्लेव्ह भागात घडली असल्याची माहिती समोर आली आहे. (businessman went to lodge with 24 year old girl found dead body also some pills and vodka in the room)
ADVERTISEMENT
54 वर्षीय व्यावसायिक तरुणीसोबत गेला होता लॉजवर
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी जेव्हा लॉजचा सफाई कर्मचारी खोलीजवळ पोहोचला तेव्हा आतील दृश्य पाहून त्याला धक्काच बसला. या घटनेबाबत स्वत: सफाई कामगाराने सांगितले की, व्यापारी ज्या रुममध्ये थांबला होता तिथे सकाळी त्याने खोलीचा दरवाजा बराच वेळ ठोठावला, पण काहीच उत्तर मिळाले नाही. आतून काहीही प्रतिसाद न मिळाल्याने सफाई कामगाराने दरवाजा ढकलून पाहिला. तर त्यावेळी खोलीचा दरवाजा उघडा असल्याचं त्याला पाहायला मिळालं. त्यामुळे तो थेट खोलीच्या आत गेला. पण समोरचं दृश्य पाहिल्यानंतर त्यालाही धक्का बसला. कारण या खोलीत व्यापारी एकटाच निपचित पडलेला होता.
बातमीवर क्लिक करा- नातेवाईकासोबत अनैतिक संबंध, OYO हॉटेलमध्ये विवाहित महिलेसोबत घडली भयंकर गोष्ट
काही गोळ्या आणि वोडका आणि मृतदेह…
दरम्यान, व्यापारी निपचित पडलेला असल्याने सफाई कामगाराने याबाबतची माहिती तात्काळ लॉजमधील इतर कामगारांना दिली. त्यानंतर येथे पोलिसांनी पाचारण करण्यात. कारण व्यापाऱ्याचा लॉजमध्येच मृत्यू झाला होता.
हे वाचलं का?
या घटनेबाबत दिल्ली पोलिसांनी सांगितले की, गाझियाबादचा राहणारा 54 वर्षीय दीपक सेठी हा व्यापारी गाझियाबादहून दिल्लीत आला होता. पोलिसांना यावेळी घटनास्थळावरून काही गोळ्या, हाताने लिहिलेली चिठ्ठी आणि व्होडकाची बाटलीही सापडली.
‘ती’ तरुणी नेमकी कोण?
तर लॉजची व्हिजिटर रजिस्टरच्या तपासणी केल्यावर पोलिसांना असं आढळून आलं की, व्यापाऱ्याने लॉजमधील रजिस्टरमध्ये अशी नोंद केली होती की, तो ज्या मुलीसोबत आला होता ती त्याची मुलगी आहे. यानंतर पोलिसांनी लॉजचं सीसीटीव्ही फुटेज देखील तपासलं.
ADVERTISEMENT
बातमीवर क्लिक करा- गोव्यात डच तरुणीसोबत घडला भयंकर प्रसंग; रिसॉर्टमधील कर्मचारीच निघाला वासनांध
यावेळी असे आढळून आले की, व्यापारी आणि एक मुलगी 30 मार्च रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास लॉजवर आले होते. तर मध्यरात्रीच्या सुमारास ती मुलगी एकटीच लॉजमधून निघून गेली होती.
ADVERTISEMENT
दरम्यान, 54 वर्षीय दीपक यांचा नेमका मृत्यू कसा झाला आणि त्याच्यासोबत असलेली मुलगी नेमकी कोण या सगळ्याचा छडा लावण्याचं आव्हान दिल्ली पोलिसांसमोर आहे. दीपक यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून त्याचा सविस्तर अहवाल आल्यानंतरच मृत्यूचं नेमकं कारण समजू शकेल.
बातमीवर क्लिक करा- ज्या मुलीच्या हत्येप्रकरणी पिता-पुत्र गेले तुरुंगात, ती आली परत; मग सापडलेला मृतदेह कुणाचा?
तसंच व्यापाऱ्यासोबत नेमकी मुलगी कोण होती.. तसंच ती मध्यरात्रीच लॉजमधून एकटीच का निघून गेली. दीपकच्या मृत्यूशीची तिचा नेमका काय संबंध आहे का? या सगळ्याच्या प्रकरणात आता दिल्ली पोलीस सध्या गुंतले आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT