Crime : आनंदवन हादरलं! बाथरूममध्ये रक्ताच्या थारोळ्यात सापडला तरूणीचा मृतदेह, नेमकं काय घडलं?
Chandrapur Crime News : आरती चंद्रवंशी या 25 वर्षीय तरूणीचे लग्न झाले होते. मात्र या तिचा घटस्फोट झाल्या कारणाने ती तिच्या आई-वडिलांसोबत कै. बाबा आमटे यांच्या आनंदवन प्रकल्पात पुनर्वसित दिव्यांगांच्या वसाहतीमध्ये वास्तव्याला होती. तिचे वडील दिगंबर चंद्रवंशी दिव्यांग (अंध) असून गेल्या 40 वर्षांपासून ते आनंदवन येथे राहतात.
ADVERTISEMENT
Chandrapur Crime News : विकास राजूरकर, चंद्रपूर : जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील बाबा आमटे यांच्या कुष्ठरोग्यांसाठी सुरु केलेल्या आनंद आश्रमात 25 वर्षीय तरुणीची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. आरती चंद्रवंशी असं या मृत तरूणीचं नाव आहे. आरती ही आनंदवन प्रकल्पात पुनर्वसित दिव्यांगांच्या वसाहतीमध्ये आई-वडिलांसोबत वास्तव्याला होती. या घटनेने आनंदवनात खळबळ माजली आहे. (chandrapur crime news 25 year old girl murder body found in bathroom baba amte anandvan)
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, आरती चंद्रवंशी या 25 वर्षीय तरूणीचे लग्न झाले होते. मात्र या तिचा घटस्फोट झाल्या कारणाने ती तिच्या आई-वडिलांसोबत कै. बाबा आमटे यांच्या आनंदवन प्रकल्पात पुनर्वसित दिव्यांगांच्या वसाहतीमध्ये वास्तव्याला होती. तिचे वडील दिगंबर चंद्रवंशी दिव्यांग (अंध) असून गेल्या 40 वर्षांपासून ते आनंदवन येथे राहतात. 26 जूनला ते आपल्या पत्नीसह उपचारासाठी सेवाग्राम येथे गेले होते. त्यानंतर काल रात्री उशिरा घरी परतल्यानंतर आरतीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात बाथरूममध्ये पडला होता. या घटनेने आनंदवनात खळबळ माजली होती.
हे ही वाचा : पवारांनी टाकला मोठा डाव, अजित पवारांच्या आमदारांशी गुपचूप भेट
या घटनेनंतर लगेचच पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन तपास सूरू केला. या तपासात मृत तरुणीच्या गळ्यावर घाव असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यामुळे वरोरा पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
हे वाचलं का?
चंद्रुपूर जिल्ह्यातील आनंदवन आश्रम हा बाबा आमटेंनी केलेल्या कामांसाठी ओळखला जातो. बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांसाठी हा आश्रम उभा केला होता. आतापर्यंत हजारो कृष्ठरोगी आणि वृद्धांना आसरा दिला आहे. सामाजिक कार्य करणाऱ्या अशा आश्रमात अशी खुनाची घटना घडल्याने एकच खळबळ माजली आहे.
हे ही वाचा : अजित पवारांवर आधी टीका केली, आता फडणवीसांकडे संरक्षणाची मागणी
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT