Sharad Pawar : पवारांनी टाकला मोठा डाव, अजित पवारांच्या आमदारांशी गुपचूप भेट; नेमकं काय घडलं?
Ajit Pawar NCP Mla : राज्य विधीमंडळ अधिवेशनाचा आज पहिला दिवस होता. या दिवशी अनेक राजकीय घडामोडी घडल्या. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची अजितदादा गटाच्या पाच ते सहा आमदारांनी आज घेतली भेट होती. विधानभवनातल्या एका खोलीमध्ये ही भेट झाल्याची सुत्रांकडून माहिती मिळत आहे.
ADVERTISEMENT
Ajit Pawar NCP Mla Meet Jayant Patil : महाराष्ट्राच्या राजकारणातली सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे पाच ते सहा आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत पुन्हा मोठा भूकंप होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अजित पवार गटाच्या (Ajit Pawar NCP) पाच ते सहा आमदारांनी आज प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांची (Jayant Patil) भेट घेतली होती. या भेटीनंतर अजित पवारांचे आमदार शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा सूरू झाली आहे. ( ajit pawar group mla meet sharad pawar ncp state president jayant patil ncp politics maharashtra politics maharashtra assembly session)
ADVERTISEMENT
राज्य विधीमंडळ अधिवेशनाचा आज पहिला दिवस होता. या दिवशी अनेक राजकीय घडामोडी घडल्या. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील विधीमंडळाच्या कामकाजासाठी आले होते. यावेळी अजितदादा गटाच्या पाच ते सहा आमदारांनी आज घेतली भेट होती. विधानभवनातल्या एका खोलीमध्ये ही भेट झाल्याची सुत्रांकडून माहिती मिळत आहे.
हे ही वाचा : चंद्रकांत पाटलांचं उद्धव ठाकरेंना चॉकलेट, कोणाला केलं चेकमेट?
विधानभवनाच्या त्या खोलीत जयंत पाटलांच्या भेटीला अजित पवार गटाच्या पश्चिम महाराष्ट्रातल्या चार ते पाच आमदार आल्याची माहिती मिळत आहे. या आमदारांची आणि जयंत पाटलांची काय चर्चा झाली? याची अद्याप काही माहिती मिळू शकली नाही. मात्र या भेटीनंतर आता अजितदादा गटाचे आमदार शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत पुन्हा फुटणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
हे वाचलं का?
जयंत पाटील अनुभवी नेते आहेत. कधी कुठले कार्ड काढायचं हे त्यांना माहिती आहे. ही तर फक्त सुरुवात आहे. शरद पवार हे महायुतीच्या नेत्यांपेक्षा कितीतरी पटीने पुढे आहेत, हे लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने समोर आले आहे. जे कुणी चांगले आहे, त्यांचे स्वागत आहे. पण ज्या आमदारांनी उन्माद केला. लोकभावनेच्या विरोधात भूमिका घेतल्या त्यांच्यावर शरद पवार, जयंत पाटील निर्णय घेतील, असे आमदार रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
हे ही वाचा : Ajit Pawar : ''अजित दादांना महायुतीतून बाहेर काढा'' BJP नेत्याची खदखद
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT