Rape Case: ‘तुझ्या भावाचा अपघात झालाय’, मामाच्या मुलाकडून तरुणीचा घात, 4 दिवस गँगरेप

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

cousin brother kidnapped girl student gang rape her along with frinds kanpur uttar pradesh crime story
cousin brother kidnapped girl student gang rape her along with frinds kanpur uttar pradesh crime story
social share
google news

उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) कानपूरमधून (Kanpur) एक धक्कादायक घटना समोर आली आहे.या घटनेत बारावीत शिकत असणाऱ्या एका मुलीवर सामूहिक बलात्कार (Gang Rape) केल्याची घटना घडली आहे. आरोपीने मुलीला फुस लावून सुरूवातीला तिचे अपहरण केले. या अपहरणानंतर तिला एका खोलीत नेऊन तब्बल 4 दिवस तिच्यावर सामूहिक बलात्कार केला होता.यानंतर आरोपींनी मुलीला मध्यरात्री एका निर्जनस्थळी सोडले होते. या संपूर्ण घटनाक्रमाने सध्या कानपूर शहर हादरलं आहे. (cousin brother kidnapped girl student gang rape her along with frinds kanpur crime story)

ADVERTISEMENT

कानपूरच्या गुजेनीची रहिवासी असलेली 12 वीची विद्यार्थीनी 18 जुलैच्या तारखेला महाविद्यालयाच्या गेट जवळून बेपत्ता झाली होती. मुलगी घरी न परतल्याने कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या काही दिवसानंतर पोलिसांना मुलगी एका निर्जन रस्त्यावर सापडली आहे. पोलिसांनी या तरूणीला पोलीस ठाण्यात नेऊन घटनेचा तपास सुरु केला होता. तसेच तिच्या कुटुंबियांना देखील या घटनेची माहिती दिली होती.

हे ही वाचा : whatsapp scam : लाईक्स आमिष अन् ठाण्यातील व्यक्तीने गमावले 37 लाख, तुम्ही ही चूक करू नका

महाविद्यालयाच्या गेट जवळून अपहरण

पीडित मुलीने पोलिसांना दिलेल्या माहितीनूसार, ”तुझ्या भावाचा अपघात झाला आहे”, असे सांगून माझ्य़ा मामाचा मुलगा कल्लू मला महाविदयालयाच्या गेट बाहेरून घेऊन गेला. मामाच्या मुलासोबत सोनू आणि राम सलजी हे त्याचे मित्र देखील होते. हे तिघेही मला एका घरात घेऊन गेले आणि त्यांनी चार दिवस माझ्यावर अत्याचार केल्याचे पीडित मुलीने सांगितले.

हे वाचलं का?

पीडित मुलीने पुढे सांगितले की, चार दिवसानंतर मला मध्यरात्री एका निर्जन रस्त्यावर सोडून देण्य़ात आले होते. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी मध्यरात्री मला पोलिस स्टेशनमध्ये आणले. मात्र पोलिसांनी या घटनेची माहिती कुटुंबियांना दिली नाही. दुसऱ्या दिवशी कुटुंबियांना पोलिसांना याबाबतची माहिती दिली. यानंतर मला मेडिकलसाठी पाठवण्यात आले होते, अशी माहिती पीडित मुलीने दिली.या प्रकरणात पोलिसांनी अद्यापतरी एकाच आरोपीला अटक केली आहे. तर इतर आरोपी अजूनही मोकाटच आहेत. इतक्या गंभीर प्रकरणात पोलिसांच्या या कारवाईवर कुटुंब संतुष्ट नसल्याचीही माहिती आहे.

हे ही वाचा : बायकोची हत्या, मेहुणीसोबत गाठला क्रूरतेचा कळस! सायको किलरने पोलिसांनाही फोडला घाम

पीडित मुलीच्या सामूहिक बलात्कार प्रकरणावर पोलीस अधिक्षक अभिषेक पांडे म्हणाले की, या प्रकरणात एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. तर इतर आरोपींचा शोध सूरू आहे. या आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात येणार आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT