वाढदिवसाच्या पार्टीला बोलावून 8 वीच्या विद्यार्थ्याची हत्या
Crime News : एका तरुणाने वाढदिवसाच्या पार्टीचे निमित्त सांगून मित्राला बोलावून हत्या केली. 21 ऑगस्ट रोजी आयुषचा जंगलात मृतदेह आढळून आला होता. मंगळवारी कुटुंबियांनी ओळख पटवली होती.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
वाढदिवसाचे मित्राला दिले निमंत्रण
जंगलात कुजलेल्या अवस्थेत आयुषचा मृतदेह
Crime News : उत्तर प्रदेशातील नोएडातून सेक्टर 24 पोलीस ठाणे क्षेत्रातील चौडा गावात एका अल्पवयीन विद्यार्थ्याची हत्या करण्यात आली. या घटनेनं परिसर हादरून गेल्याचे वृत्त आहे. एका तरुणाने वाढदिवसाच्या पार्टीचे निमित्त सांगून मित्राला बोलावून हत्या केली, नंतर तो 16 ऑगस्ट रोजी गायब झाला. आरोपीची किशोर अशी ओळख समोर आली आहे. 21 ऑगस्ट रोजी आयुषचा जंगलात मृतदेह आढळून आला होता. मंगळवारी कुटुंबियांनी ओळख पटवली होती. पोलिसांनी या प्रकरणात एका संशयिताला ताब्यात घेतले असून प्रकरणाचा तपास केला आहे.
हे ही वाचा : नांदेड हादरलं! चॉकलेटचं आमिष दाखवत तीन वर्षीय चिमुकलीवर अत्याचार
वाढदिवसाचे मित्राला दिले निमंत्रण
नोएडा पोलिसांच्या माहितीनुसार, सेक्टर 20 येथील रहिवासी असलेल्या आयुष शुक्ला इयत्ता आठवीत शिक्षण घेत होता. चौरा गावातील तरुणाशी त्याची मैत्री होती. 16 ऑगस्ट रोजी तो सायंकाळी आपल्या घराच्या छताखाली पतंग उडवताना त्याच्या मित्राने त्याला बोलावले आणि वाढदिवशी येण्याबाबत सांगितले, दरम्यान बर्थडे पार्टीनंतर आयुष परतलाच नाही.
या घटनेत आईने आरोप केला की, 17 ऑगस्ट रोजी जेव्हा त्या सेक्टर 20 पोलीस ठाणे परिसरात पोहोचल्या असता, तिथे कोणतीही बेपत्ता व्यक्तची तक्रार दाखल केली नव्हती. चौरा गावात राहणाऱ्या एका मित्रावर संशय आल्याने त्यांनी सेक्टर 24 पोलीस ठाण्याशी संपर्क साधला असता, कारवाई करण्यात आली नाही.
जंगलात कुजलेल्या अवस्थेत आयुषचा मृतदेह
दरम्यान, कुटुंबीयांच्या म्हणण्यांनुसार, त्यांनी स्वत:हून आयुषचा शोध सुरू ठेवला. 21 ऑगस्ट रोजी सेक्टर 24 पोलिसांनी सेक्टर 54 च्या जंगलात आयुषचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता.
