एक-दोन नव्हे तर तब्बल 9 वासनांध तरूण, अल्पवयीन मुलीवर पाशवी बलात्कार; 'तो' Video शूट करून...
crime news : अल्पवयीन मुलीवर एक दोन नाहीतर तब्बल 9 तरुणांनी लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तरुणाने तिला प्रथम प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि नंतर तिला अंमली पदार्थाचे सेवन करण्यास सांगितले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
9 जणांकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
हातपाय बांधून तिला मारहाण
बहिणीने सांगितला एकूण प्रकार
Crime News : अल्पवयीन मुलीवर एक दोन नाहीतर तब्बल 9 तरुणांनी लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तरुणाने तिला प्रथम प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि नंतर तिला अंमली पदार्थाचे सेवन करण्यास सांगितले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला. तसेच मुलीचे अश्लील व्हिडिओ बनवल्याचा पीडितेचा आरोप आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगर येथील असल्याचे सांगण्यात येत आहे.
हे ही वाचा : पत्नीचे घरमालकाशी प्रेमसंबंध, अखेर पत्नीच्या त्रासाला कंटाळून तरुणाने व्हिडिओ रेकॉर्ड करत उचललं टोकाचं पाऊल
9 जणांकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
संबंधित प्रकरणातील आरोपींची नावे आता समोर आली आहेत. जुनैद, हालिस, मुमताज, रायन, शादाब, हकिक, जैद, सिराजुद्दीन यांच्यासह आणखी एकाने असे एकूण 9 जणांनी अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची मन हेलावून टाकणारी घटना आहे. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. दरम्यान, तरुणाने पीडितेला व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकीही दिली आणि नंतर पैसेही मागितले. पण, पीडितेनं पैसे देण्यास नकार दिला. तेव्हा तरुणाने त्याच्या मित्रांना व्हिडिओ पाठवून व्हायरल केला. त्यानंतर संबंधित तरुणांनी पीडितेसोबत तब्बल सात महिने लैंगिक शोषण केले. त्यानंतर तिनं कंटाळून एकूण घडलेला प्रकार तिच्या बहिणीला सांगितला.
या एकूण घटनेची माहिती पीडितेच्या बहिणीने तिच्या कुटुंबियांना सांगितली. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळपणे 8 जणांवर आणि इतर अज्ञातावर गुन्हा दाखल केला. पोलिसांनी संबंधित प्रकरणात आयपीएस कलम 70 (1), 5 (G), 6, 66 E अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आता जुनैद, हालिस, मुमताज, रायन, शादाब, हकिक, जैद, सिराजुद्दीन आणि इतर आरोपींचा शोध घेण्यात आला.
हे ही वाचा : रायगड हादरलं! पोटच्या लेकरांनीच 'त्या' एका कारणासाठी आईवडिलांची केली हत्या, मृतदेह दोन दिवस कुजलेल्या अवस्थेत खोलीत
हातपाय बांधून तिला मारहाण
संबंधित प्रकरणात आरोपी पीडितेची बहिण पुढे आली आणि तिने रडत रडत हा सर्व प्रकार सांगितला. गेली सात महिने तिच्यावर लैंगिक अत्याचार सुरु होता. तिला अनेकदा ब्लॅकमेल केले. तिला अंमली पदार्थाचे सेवनही करण्यास भाग पाडण्यात आले, नंतर तिचे हातपाय बांधून तिला मारहाण केली. संबंधित प्रकरणात आता पीडितेच्या न्यायाची मागणी करण्यात आली आहे. कुटुंबियांनी नराधमांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली. पोलिसांनी गुन्हेगारांवर गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध घेणं सुरु आहे.










