बायको मिरवणुकीत बेधुंदपणे नाचत होती, नवऱ्याची सटकली अन् थेट डोक्यात वरवंट्याने हल्ला करत संपवलं
Crime News : नवऱ्याने बायकोवर वरवंटा घालून हत्या केली. बायको एका धार्मिक मिरवणुकीत बराच वेळ नाचत होती. पण हेच कुठेतरी नवऱ्याला खटकलं होतं. हाच राग मनात ठेवून नवऱ्याने तिला संपवलं. या घटनेची माहिती पोलिसांना समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी आरोपी पती हा संतापला असून पोलीस शोध घेत आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पतीने पत्नीच्या डोक्यात वरवंट्याने हल्ला करत संपवलं
पलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या
Crime News : बिहारची राजधानी पाटणा येथे एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नवऱ्याने बायकोवर वरवंट्याने हल्ला करत हत्या केली. बायको एका धार्मिक मिरवणुकीत बराच वेळ नाचत होती. पण हेच कुठेतरी नवऱ्याला खटकलं होतं. हाच राग मनात ठेवून नवऱ्याने तिला संपवलं. या घटनेची माहिती पोलिसांना समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी आरोपी पती हा संतापला असून पोलीस शोध घेत आहेत.
हे ही वाचा : ठाणे: पहाटे घर सोडल्यानंतर तिघींचा नाही पत्ता; 3 दिवसांपासून बेपत्ता... ठाणे पोलिसांचं पथक लखनऊला रवाना
पतीने पत्नीच्या डोक्यात वरवंट्याने हल्ला करत संपवलं
पाटणाच्या सचिवालयाचे एसडीपीओ-2 साकेत कुमार यांनी सांगितलं की, शास्त्रीनगर परिसरात आर मंदिरावर एका खूनाची तक्रार दाखल करण्यात आल्याचं वृत्त आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता, पतीनेच आपल्या पत्नीच्या डोक्यात वरवंट्याने हल्ला करत संपवल्याची माहिती समोर आली. नंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
पलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या
कुटुंबाच्या तक्रारीवरून पोलिसांनी एफआरआय दाखल केला. घटनास्थळी एफएसएल पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते. नंतर त्यांनी तपास सुरु करत घटनास्थळावरून पुरावे गोळा केले होते. एसडीपीओ यांनी सांगितलं की, या प्रकरणाचा पोलीस पुढील तपास करत आहेत. दरम्यान पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. नंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला.
हे ही वाचा : शिवसेना पक्ष अन् चिन्हाची सुनावणी 23 जानेवारीलाही होणार नाही? सुप्रीम कोर्टात काय घडलं? मोठी अपडेट समोर
घटनास्थळी असलेल्या उपस्थितांनी दिलेल्या माहितीनुसार, हे कुटुंब मूळचे जहानाबादचे आहे. पत्नी एका मिरवणुकीत नाचत होती. पती नाराज झाला आणि नंतर दोघांमध्ये वाद उसळला. नंतर संतापलेल्या पतीने वरवंटा उचलून पत्नीवर हल्ला चढवला.










