23 वर्षीय तरुणाचे 7 वर्षीय चिमुरड्यावर अत्याचार, मशिदीच्या छतावर नेत नको तेच... सीसीटीव्हीतून सत्य आलं समोर

मुंबई तक

Crime News : एका तरुणाने एका सात वर्षाच्या अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केले. नमाज शिकवण्याच्या नावाखाली आरोपीने हे घृणास्पद कृत्य केल्याची माहिती समोर आली. तरुणाने पीडित मुलाला मशि‍दीच्या छतावर नेले आणि त्याच्याशी अनैसर्गिक लैंगिक शरीरसंबंध बनवले.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

तरुणाने एका सात वर्षाच्या अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केले

point

नमाज अदा करण्याच्या नावाखाली आरोपीचे हैवानी कृत्य

Crime News : एका तरुणाने 7 वर्षाच्या अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केले. नमाज शिकवण्याच्या नावाखाली आरोपीने हे घृणास्पद कृत्य केल्याची माहिती समोर आली. तरुणाने पीडित मुलाला मशि‍दीच्या छतावर नेले आणि त्याच्याशी अनैसर्गिक लैंगिक शरीरसंबंध बनवले. ही घटना गुजरातमधील अहमदाबादमध्ये घडल्याचं सांगण्यात येत आहे. 

हे ही वाचा : 'महात्मा फुले यांच्या पुतळ्याच्या विटंबनामागे RSS', प्रकाश आंबेडकरांचा संताप, भुजबळांनी अमित शाहांना लिहिलं पत्र

मुलाला नमाज अदा कराण्याचे आमिष दखवून मिशिदीच्या छतावर नेत केले अत्याचार 

संबंधित घटनेच्या काही तासानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपीचे नाव नोमान शेख (वय 23) असे आहे. तो पीडित मुलाच्या शेजारील असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याने पीडित मुलाला नमाज अदा कराण्याचे आमिष दाखवले, नंतर दुपारी 1:37 वाजता मिशिदीच्या छतावर नेत सुमारे 15 ते 20 मिनिटे अत्याचार केला. 

पीडित मुलाने घरी परतल्यानंतर घटनेची माहिती दिली

दरम्यान, त्याने मुलावर असं घृणास्पद कृत्य केलं, या घटनेनंतर मुलगा घरी परतला असता त्याने क्रूरतेची एकूण कहाणी सांगितली. त्याची प्रकृती बिघडत असल्याचे पाहून त्याला तात्काळपणे रुग्णालयात दाखल केले. मुलाने दिलेल्या जबाबाच्या आधारे गायकवाड हवेली पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आणि पुढील तपास सुरु केला. 

हे ही वाचा : मोबाईल फोडला म्हणून मुलगी 'असं' करेल याची कोणीच कल्पना केली नव्हती; हातावर मेहंदी अन्...

हे वाचलं का?

    follow whatsapp