गे डेटिंग ॲपवर मित्र बनवले, भेटायला बोलवायचे; निर्जनस्थळी खेळ सुरू

मुंबई तक

Crime News : गे डेटिंग ॲपवर लोकांशी मैत्री करून त्यांना भेटायला बोलावले होते. जेव्हा कोणी समलैंगिक संबंध ठेवण्याच्या उद्देशाने त्यांच्याशी संपर्क साधला असता, तेव्हा ही टोळी पीडितांना आपल्या जाळ्यात ओढायची. दरम्यान संबंधित टोळी हल्ला करत तरुणांना ब्लॅकमेल करून पैसे उकळायची.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA

बातम्या हायलाइट

point

गे डेटिंग ॲप प्रकरणात दोघांना अटक 

point

पीडितांना मारहाण करत ब्लॅकमेल करत पैसे उकळले

Crime News : गे डेटिंग ॲपवर लोकांशी मैत्री करून त्यांना भेटायला बोलावले होते. जेव्हा कोणी समलैंगिक संबंध ठेवण्याच्या उद्देशाने त्यांच्याशी संपर्क साधला असता, तेव्हा ही टोळी पीडितांना आपल्या जाळ्यात ओढायची. दरम्यान संबंधित टोळी हल्ला करत तरुणांना ब्लॅकमेल करून पैसे उकळायची. ही घटना राजस्थानातील जयपूर येथील आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

हे ही वाचा : 18 वर्षीय सुनिताचा मृतदेह तलावात आढळला, शरीराला बांधले दगड

गे डेटिंग ॲप प्रकरणात दोघांना अटक 

या घटनेत करधनी पोलिसांनी या प्रकरणात दोघांना अटक केली आहे. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली गाडीही जप्त केली. पोलिसांच्या माहितीनुसार, जयपूरमध्ये गे ॲप्सच्या माध्यमातून तरुणांना लक्ष करण्यात आल्याची तक्रार आहे, असा आरोप टोळीतील सदस्य अॅपद्वारे तरुणांशी साधण्यात आला होता. त्यांच्याशी चॅटिंग करून आणि मैत्रीनंतर ते त्यांना अशा ठिकाणी बोलावत, जिथे आजूबाजूला अधिकची गर्दी नव्हती. 

पीडितांना मारहाण करत ब्लॅकमेल करत पैसे उकळले

आरोप असाय की, पीडितांना मारहाण करून नंतर पैसे उकळण्यासाठी ब्लॅकमेल केले गेले. जेव्हा हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत गेले असता, जयपूर पश्चिम पोलिसांनी ते प्रकरण गांभीर्याने घेत तपास करण्यासाठी एक पथक तयार केले होते. यानंतर पोलिसांनी संशयितांच्या हालचालींवर पाळत ठेवण्यास सुरूवात करण्यात आली. तांत्रिक माहिती आणि गुप्त माहितीच्या आधारे, त्यांनी या नेटवर्कशी संबंधित असू शकणाऱ्या व्यक्तींना ओळखण्याचा प्रयत्न केला. 

हे ही वाचा : 'अदाणी-अंबानीच्या हातात गणपती देऊन, आम्ही गरबा बघायचा का?', मनसे नेते लालबाग आणि चिंतामणी मंडळावर संतापले!

पुढील तपासानंतर पोलिसांनी दोन संशयितांची माहिती मिळाली. करधनी पोलिसांनी कारवाई करत अनिल रुलनिया आणि मदन नेहरा यांना अटक केली होती. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेली गाडीही जप्त केली. या एकूण चौकशीदरम्यान, दोन्ही आरोपींना आतापर्यंत किती तरुणांना लक्ष्य केले, हे पोलिसांनी निश्चित करण्याचा प्रयत्न केला. हे प्रकरण केवळ जयपूरपर्यंत मर्यादीत आहे की, हे जाळे देशभरात पसरले? यामागे नेमकं कोण आहे? याचा पुढील तपास करण्यात येत आहे.