पार्टीहून परतताना तरुणीवर सामूहिक बलात्कार; दोन महिलांसह तिघांना अटक
Crime News : दिल्लीतील प्रीत विहार येथील कॅफेमध्ये पार्टी केल्यानंतर 22 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणी दोन महिलांसह तिघांना अटक करण्यात आली असून तीन आरोपी फरार आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पार्टीहून परतताना तरुणीवर सामूहिक बलात्कार
दोन महिलांसह तिघांना अटक
Crime News : दिल्लीतील प्रीत विहार परिसरात कॅफेमध्ये झालेल्या पार्टीदरम्यान 22 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याचा आरोप समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन महिलांसह तिघांना अटक केली असून अन्य तीन आरोपी फरार आहेत. पीडित तरुणी आणि आरोपी एकाच कॅफेमध्ये काम करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सोमवारी रात्री प्रीत विहार येथील सल्तनत कॅफेमध्ये पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीला पीडित तरुणीसह एकूण आठ जण उपस्थित होते. पार्टी संपल्यानंतर तरुणीवर दोन पुरुषांनी सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे. या घटनेत त्यांच्यासोबत असलेल्या इतर सहकाऱ्यांनीही साथ दिल्याचा दावा तरुणीने केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा : पुणे: कोयत्याने अक्षरश: हात तोडले.. कोर्टाबाहेर हल्ला झालेल्या मंदार किवळेचं नेमकं झालं तरी काय?
पार्टीदरम्यान मद्यपानही करण्यात आल्याची माहिती
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि आरोपी कर्करडूमा येथील क्रॉस रिव्हर मॉलमध्ये असलेल्या कॅफे ८ मध्ये काम करतात. सोमवारी रात्री पीडित तरुणीसह आठ जण प्रीत विहार येथील सल्तनत कॅफेमध्ये पार्टीसाठी जमले होते. या कॅफेची नेहमीची बंद होण्याची वेळ रात्री ११.३० वाजताची आहे. मात्र, कॅफेमधील एका कर्मचाऱ्याकडे चावी असल्याने रात्री उशिरा पुन्हा कॅफे उघडण्यात आले. त्यानंतर सर्वांनी एकत्रितपणे पार्टी सुरू ठेवली. या पार्टीदरम्यान मद्यपानही करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पहाटे साडेतीनच्या सुमारास सर्वजण कॅफेमधून बाहेर पडले. त्यानंतर काही वेळातच तरुणीवर अत्याचार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
हेही वाचा : पुणे : सुनावणी संपवून बाहेर येताच गेम केला! मंदार किवळेवरील क्रूर हल्ल्यामागं नेमकं कारण काय?
दोन पुरुषांकडून सामूहिक बलात्कार केला
पीडित तरुणीच्या आरोपानुसार, दोन पुरुषांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या इतर सहकाऱ्यांनीही त्यांना साथ दिली. या प्रकरणी पोलिसांनी चार पुरुष आणि दोन महिलांसह एकूण सहा जणांविरोधात एफआयआर दाखल केला आहे. त्यापैकी दोन महिलांसह तिघांना अटक करण्यात आली आहे. उर्वरित तीन आरोपींचा शोध सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार, कथित अत्याचारानंतर तरुणीने तातडीने पोलिसांकडे धाव घेतली नव्हती. सीसीटीव्ही फुटेजमध्ये ती एका पुरुष मित्रासह आणि अन्य दोन महिलांसोबत वाहनातून जाताना दिसत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यानंतर मंगळवारी पहाटे सुमारे ५.४५ वाजता ती पोलीस ठाण्यात पोहोचली आणि तिने तक्रार दाखल केली.
सध्या पोलीस ठाण्यात पीडित तरुणीचा जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच तिचा जबाब दंडाधिकाऱ्यांसमोरही नोंदवण्यात येणार आहे. या प्रकरणात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना अटक करण्यात आली आहे. उर्वरित तीन आरोपी फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. पार्टीसाठी कॅफे उघडण्यापासून ते पहाटे घडलेल्या कथित अत्याचारापर्यंतच्या घटनांची पोलीस चौकशी करत आहेत. पीडित तरुणीच्या जबाबातून या प्रकरणातील अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. या प्रकरणाचा पुढील तपास दिल्ली पोलीस करत आहेत.
