‘डिलिव्हरी बॉय’चे काम करून MPSCची तयारी; राहुल हंडोरे इतका क्रूर का झाला?
Darshana Pawar Murder : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची वन विभागाची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या पुण्याच्या दर्शना पवार हत्याप्रकरणात आरोपी मित्र राहुल हंड़ोरेला मुंबईच्या अंधेरी रेल्वे स्टेशनवरून अटक करण्यात आली आहे. या अटकेनंतर पोलिसांनी दर्शना पवार हत्याप्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.
ADVERTISEMENT
Darshana Pawar Murder : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची वन विभागाची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या पुण्याच्या दर्शना पवार हत्याप्रकरणात आरोपी मित्र राहुल हंड़ोरेला मुंबईच्या अंधेरी रेल्वे स्टेशनवरून अटक करण्यात आली आहे. या अटकेनंतर पोलिसांनी दर्शना पवार हत्याप्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. राहुल हंडोरे हा पुण्यात राहुन दिवसरात्र फुड डिलिव्हरीचे काम करून एमपीएससीची तयारी करत होता. आपल्या करीअरला घेऊन इतका फोकस असणारा राहुल हंडोरे इतका क्रुर कसा बनला? असा सवाल आता उपस्थित होत आहे. (darshana pawar murder case accuse rahul handore work as delivery boy and preparing for mpsc pune police)
दर्शना पवार आणि आरोपी राहुल हंडोरे हे दोघेही एमपीएससीची परीक्षा देत होते. तर दर्शना पवारने महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची वन विभागाची परीक्षा उत्तीर्ण केली होती. ती राज्यातून तिसरी आली होती. तर आरोपी देखील एमपीएससीची परीक्षा देत होता. राहुल हंडोरे हा दिवसरात्र एक करून पुण्यात फुड डिलिव्हरी करून एमपीएससीची परीक्षेची तयारी करत होता. आपल्या करीअरसाठी राहुल हंडोरे किती मेहनत घेत होता, हे पोलिसांनी दिलेल्या माहितीतून समोर आले आहे.
हे ही वाचा : ‘मला त्याचे तुकडे करायचेत’, दर्शना पवारच्या आईचा ह्रदय पिळवटून टाकणारा टाहो!
डोक्यावर शरीरावर जखमा
पुणे ग्रामीण पोलिसांनी आज दर्शना पवार हत्याप्रकरणातील आरोपीला अटक करून प्रसिद्धी माध्यमांसमोर आणले होते. यावेळी पुणे ग्रामीणचे एसपी अंकित गोयल यांनी घटनेसंदर्भात पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे. पीडित तरूणीचा मृतदेह 18 जून 2023 रोजी नऱ्हे पोलीस स्टेशन हद्दीत सापडला होता. या तरूणीची ओळख पटली असून तिचे नाव दर्शना दत्तु पवार (वय 26) असे समोर आले आहे. घटनास्थळी काही दगडावर रक्ताचे डाग सापडले आहेत. यावेळी पोलिसांनी दर्शनाचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला होता. या पोस्टमार्टममध्य़े दर्शनाच्या डोक्यावर आणि शरीरावर जखमा आढळल्या आहेत. त्यामुळे पोलिसांनी संशयित आरोपी राहुल हंडोरे विरोधात कलम 302,201 आयपीसी अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
आरोपीची गुन्ह्याची कबुली
दर्शना पवार हत्याप्रकरणानंतर आरोपी हा फरार होता. आरोपी हा ट्रेनमधून प्रवास करून पोलिसांना चकवा देत होता. आरोपीने पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणी या दरम्यान प्रवास केला होता. दरम्यान घटनास्थळावरील पुरावे आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने दिलेल्या माहितीनुसार गुन्ह्यातील आरोपी राहुल हंडोरे (वय 28) ला ताब्यात घेतले आहे. आरोपीचे नाव निश्चित झाल्यानंतर पोलिसांची पाच पथक तयार करून शोध सुरु केला होता. शेवटी काल उशीरा रात्री मुंबईच्या अंधेरी रेल्वे स्टेशनवरून त्याला अटक करण्यात आली आहे, तसेच राहुल हंडोरेने गुन्ह्याची कबूली दिली आहे.
‘या’ कारणामुळे रचला हत्येचा कट
दर्शना पवार हिचा मामाचे घर आणि आरोपी राहुल हंडोरेचे घर समोरा समोर होते. त्यामुळे दोघांची लहानपणापासून ओळख होती. या ओळखीतून त्यांच्यात प्रेम जुळलं होत का? याची माहिती अद्याप समोर आली नाही आहे. पण दर्शनाने आरोपी राहुल हंडोरेला लग्नास नकार दिला होता. या कारणामुळे राहुल हंडोऱेने दर्शना पवारची हत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Pune : बायकोच्या नरडीचा घेतला घोट, मुलं फेकली विहिरीत; सुसाईड नोट वाचून पोलीस हादरले!
दरम्यान या प्रकरणाचा पुढचा तपास सुरु आहे. आता या प्रकरणात आरोपीने हा गुन्हा कसा केला? घटनाक्रम काय होते? या हत्येमागचं कारण काय होतं? या सर्व गोष्टी चौकशीत समोर येणार आहेत. तसेच आरोपीला न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असून पोलीस कोठडीची मागणी करण्यात येणार आहोत. न्यायालयाकडून पोलीस कोठडी मिळाल्यानंतर आरोपीच्या चौकशीत अनेक गोष्टी समोर येणार आहेत, अशी माहिती अंकीत गोयल यांनी दिली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT