Crime News: 14 वर्षाच्या मुलाच्या डोक्यात सुडाचं भूत, अल्पवयीन मित्राला जागीच संपवलं!

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Delhi Crime 14-year-old boy stabbed a 16-year-old boy with a knife police were also shocked to know the reason
Delhi Crime 14-year-old boy stabbed a 16-year-old boy with a knife police were also shocked to know the reason
social share
google news

Delhi Murder News : दिल्लीतील (Delhi) सब्जी मंडी परिसरात एका अल्पवयीन मुलाच्या (Minor Murder) हत्येप्रकरणी पोलिसांनी धक्कादायक खुलासा केला आहे. 29 ऑक्टोबरच्या (रविवारी) रात्री सब्जी मंडी परिसरात मारामारी झाली. यावेळी रक्तबंबाळ झालेल्या एका अल्पवयीन मुलाला रूग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी पीसीआर कॉलवर पोहोचलेल्या पोलीस पथकाला रक्तबंबाळ तरुणावर चाकूने वार केल्याची माहिती मिळाली. (Delhi Crime 14-year-old boy stabbed a 16-year-old boy with a knife police were also shocked to know the reason)

ADVERTISEMENT

यानंतर दिल्ली पोलिसांचे (Delhi Police) पथक रूग्णालयात पोहोचले. त्यांना आढळलं की, जखमी अल्पवयीन मुलाच्या (वय 16 वर्ष) पोटावर चाकूची जखम होती. त्याला ऑपरेशन थिएटरमध्ये हलवण्यात आले.

वाचा : Manoj Jarange: ‘या सरकारला एकाचा बळी घ्यायचाय तर…’, जरांगे-पाटलांना अश्रू अनावर!

प्रत्यक्षदर्शीच्या जबाबावरून आयपीसी कलम 307 अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला. उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू झाला. या प्रकरणातील कलम 307 चे रूपांतर आयपीसीच्या कलम 302 मध्ये म्हणजेच हत्येच्या गुन्ह्यात झाले.

हे वाचलं का?

वाचा : Odi World Cup 2023 : सेमी फायनल आधीच टीम इंडियाला धक्का, ऑलराऊंडर खेळाडूच…

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीला पकडण्यात आले असून तो 14 वर्षांचा अल्पवयीन मुलगा असल्याचे निष्पन्न झाले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीने उघड केले की, मृत मुलाने आपल्याला यापूर्वी अनेकदा मारहाण केली होती, त्यामुळे त्याला त्याच्याविरुद्ध राग होता आणि याची तो सूड उगवण्याची संधी शोधत होता. 29 ऑक्टोबर रोजी संधी मिळताच त्याने त्याच्यावर चाकूने हल्ला केला.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT