Crime: कंपास, ब्लेड अन्… गर्भपातास नकार देताच प्रियकराचा गर्लफ्रेंडवर हल्ला!

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Delhi Crime News a Boyfriend tried to Kill his Girlfriend cause she was not ready to do abortion
Delhi Crime News a Boyfriend tried to Kill his Girlfriend cause she was not ready to do abortion
social share
google news

Delhi Crime News : दिल्लीतील (Delhi) मयूर विहार परिसरात 19 वर्षीय गर्भवती मुलीवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी (Delhi Police) अटक केली आहे. हा तरुण गर्भवती तरुणीचा प्रियकर असल्याचा आरोप आहे. खुनाच्या उद्देशाने त्याने तरुणीवर स्क्रू ड्रायव्हर, ब्लेड आणि दगडाने वार केले. त्याला मुलीचा गर्भपात (Abortion) करायचा होता. मात्र मुलगी यासाठी तयार नव्हती. (Delhi Crime News a Boyfriend tried to Kill his Girlfriend cause she was not ready to do abortion)

ADVERTISEMENT

योगेश देढा असे आरोपीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी (11 जानेवारी) सकाळी चिल्ला गावातील अग्निशमन सेवा कार्यालयाजवळ आयुर्वेद क्लिनिकमध्ये काम करणारी एक तरूणी रक्ताने माखलेल्या अवस्थेत आढळली. पोलिसांनी सांगितले की, पीडित तरूणी लोकनायक रूग्णालयात जीवन-मरणाची झुंज लढत आहे. तिला व्हेंटिलेटर ठेवण्यात आले आहे.

वाचा : Delhi News : 6 जणांचा गाढ झोपेतच मृत्यू! नेमकं घडलं तरी काय?

पूर्व दिल्लीचे अतिरिक्त पोलीस उपायुक्त अचिन गर्ग यांनी सांगितले की, योगेश देढा हा चिल्ला गावचा रहिवासी आहे आणि त्याने पीडितेला मृत समजून घटनास्थळी सोडले होते. शनिवारी (13 जानेवारी) आरोपीला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले.

हे वाचलं का?

वाचा : Milind Deora : शिंदेंच्या शिवसेनेत जाण्यामागे देवरांचा ‘हा’ आहे खरा प्लॅन?

पीडितेसोबत नेमकं घडलं काय? पोलीस अधिकाऱ्यांनी दिली माहिती

एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, पीडिता आणि आरोपी एकाच परिसरात राहत होते आणि काही वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. अधिकाऱ्यांनी सांगितले, ‘गेल्या तीन वर्षांपासून दोघे रिलेशनशिपमध्ये होते, पण जेव्हा पीडितेने ती प्रेग्नेंट असल्याचं आरोपीला सांगितलं तेव्हा त्यांच्यात वाद सुरू झाला.
आरोपी पीडितेवर गर्भपातासाठी दबाव आणत होता. तिला काही गोळ्या द्यायचा, ज्यामुळे गर्भपात होऊ शकतो.

वाचा : Crime : डेटिंग अ‍ॅपवर भेट, ऑफिसमध्येच केला बलात्कार, व्हिडीओ बनवून 26 वर्षीय…

जेव्हा पीडितेने आरोपीला गर्भपातास नकार दिला, तेव्हा आरोपी चिडला आणि त्याने एक कट रचला. त्याने पीडितेला भेटायला बोलावलं. अशोक नगर मेट्रो स्टेशनजवळ ती त्याला भेटली. त्यानंतर आरोपी योगेशने तिच्यावर जीवघेणा हल्ला केला.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT