‘…आणि नरेंद्र मोदींना मारून टाकेन’, पुण्यातील तरुणाची धमकी, पोस्टमध्ये काय?

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

destroy hinduism kill pm narendra modi to threat received in comment website pune story
destroy hinduism kill pm narendra modi to threat received in comment website pune story
social share
google news

Threat to kill Pm Narendra Modi : ‘मी भारतात मोठा बॉम्बस्फोट घडवण्याची योजना आखत आहे. आतंकवादी संघटनांनाही आर्थिक स्वरूपाची मदत पुरवेन, मी हिंदु धर्माला नष्ट करेन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील मारून टाकेन’, अशा आशयाची धमकी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांना देण्यात आली आहे. या धमकीने आता एकच खळबळ माजली आहे. या प्रकरणी आता पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीवरून आता पोलिसांनी गुन्हा दाखल करून चौकशीला सुरुवात केली आहे. (destroy hinduism kill narendra modi to threat received in comment website pune story)

ADVERTISEMENT

नेमकं प्रकरण काय?

पीटीआय रिपोर्टनुसार, राज्यात हिंदुत्वासंबंधी एक वेबसाईट चालवली जाते. या वेबसाईटवर हिंदु धर्मासंबंधित माहिती शेअर केली जाते. या वेबसाईटच्या एका कमेंट सेक्शनमध्ये एक धमकी देण्यात आली आहे. या धमकीत भारतात बॉम्बस्फोट घडवून आणेन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही मारून टाकेन अशी धमकी देण्यात आली आहे.

हे ही वाचा : हॉरर किलिंग! हिंदू मुलासोबत प्रेमसंबंध, भररस्त्यावर वडील अन् भावाने…

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे जिल्हयाचे रहिवाशी असलेले राहुल दुधाने हिंदुत्वाशी संबंधित एक वेबसाईट चालवतात. 6 ऑगस्ट रोजी राहुल दुधाने आपल्या मुलाच्या उपचारासाठी त्याला नजिकच्या रूग्णालयात जात होते. या दरम्यान आपली वेबसाईट तपासत असताना त्यांना एम ए मोखिम नावाच्या व्यक्तीची एक कमेंट सापडली. या कमेंटमध्ये देशाला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धमकी देण्यात आली होती. ”मी भारतात मोठा बाम्बस्फोट घडवण्याची योजना आखतोय, आतंकवादी संघटनांनाही पैसा पुरवत आहे. मी हिंदु धर्माला नष्ट करून टाकेन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील मारून टाकेन”, असा आशयाची धमकी एम ए मौखिमने दिली होती.

हे वाचलं का?

हे प्रकरण फारच गंभीर असल्याचे लक्षात येताच दुधाने याने पोलिसांना फोन लावून पोलिसांना याबाबतची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी एम ए मौखिम याच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिकचा तपास सुरु आहे.

हे ही वाचा : No-Confidence Motion : ‘हुकूमशहा किती घाबरट… राहुल गांधींना फक्त 4 मिनिटे दाखवलं’, काँग्रेसचा आरोप

या प्रकरणावर पोलिस उपायुक्त सुहेल शर्मा म्हणाले की, वेबसाईटवर ही कमेंट सार्वजनिकरित्या उपलब्ध होती. ज्या आयपी अॅड्रेसवरून ही टिपण्णी करण्यात आली होती, ती भारताबाहेरची असल्याची माहिती आहे. या प्रकरणी आम्ही गुन्हा दाखल केला आहे. तसेच या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे, अशी माहिती शर्मा यांनी दिली.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT