Dhule Crime : एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, नेमकं काय घडलं? धुळे हादरलं!

मुंबई तक

ADVERTISEMENT

dhule crime news four family member commit suicide dhule shocking crime story  marathi news
एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यूने खळबळ

point

चौघांच्या मृत्यूने धुळ्यात खळबळ

point

चौघांच्या मृत्यूमागचे कारण काय?

Dhule Crime News : नाशिकनंतर आता धुळे शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. शहरातील प्रमोद नगर भागात ही घटना घडली आहे. या घटनेने धुळे शहर हादरलं आहे. प्राथमिक माहितीनुसार या चौघांनी आत्महत्या केल्याची माहिती  आहे. मात्र या आत्महत्येमागचं कारण अद्याप समजू शकले नाही आहे. तसेच मृत व्यक्तीच्या खिशात एक चिठ्ठी सापडली आहे, मात्र या चिठ्ठीतूनही काहीच स्पष्ट होत नाही. त्यामुळे या सामुहिक आत्महत्येच्या घटनेची उकल करण्याचे पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे. (dhule crime news four family member commit suicide dhule shocking crime story  marathi news) 

ADVERTISEMENT

धुळ्याच्या प्रमोद नगर परिसरातील श्री समर्थ कॉलनीत गिरासे कुटुंबीय राहत होते. प्रवीण गिरासे यांचे फर्टीलायझरचे दुकान असून ते त्याच्या पत्नी आणि दोन मुलांसह या परिसरात राहत होते. मंगळवारी आपल्या मुलाचे अॅडमीशन करण्यासाठी मुंबईला जात असल्याचे त्यांनी शेजाऱ्यांना सांगितले होते. त्यामुळे मंगळवारपासून त्यांचा दरवाजा बंद होता. 

हे ही वाचा : Ajit Pawar: 'वेडेवाकडे विधान करून सरकारला...', शिंदे-फडवणवीसांच्या नेत्यांना अजितदादांनी सुनावलं!

या दरम्यान प्रवीण गिरासे यांची बहीण आज त्यांना भेटण्यासाठी घरी आली होती. घराजवळ पोहोचताच त्यांना घराचा दरवाजा वरच्यावर लावलेला दिसला. तो त्यांनी उघडला असता ही धक्कादायक घटना उघडकीस आली होती. घरात गिरासे कुटुंबातील पती, पत्नी आणि दोन मुलांचे मृतदेह आढळून आले होते. या घटनेनंतर प्रवीण यांच्या बहिणीला धक्काच बसला होता. 

हे वाचलं का?

पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रवीण गिरासे यांनी आत्महत्या केली होती तर त्याच्या बायको आणि पोरांनी विष प्यायलं होतं. प्रवीण मानसिंग गिरासे (48),दीपांजली गिरासे (44), मितेश गिरासे (18), सोहम गिरासे (12) असे आत्महत्या केलेल्या चारही जणांची नावे आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन तपास सूरू केला आहे. या तपासा दरम्यान पोलिसांना प्रवीण गिरासे यांच्या खिशात एक सुसाईड नोटही सापडली होती. या सुसाईड नोटमध्ये त्यांनी आमच्या आत्महत्येसाठी कुणालाही जबाबदार धरू नये, असे लिहले आहे.

दरम्यान नेमकं असं काय घडलं होतं की गिरासे कुटुंबियांना सामुहिक आत्महत्या करावी लागली होती. या मागचा तपास आता पोलीस करीत आहे. या घटनेने आता धुळे हादरलं आहे. 

ADVERTISEMENT

हे ही वाचा : One Nation One Election: 'मोदी दर्शनाला गेले आणि गणपती पावला केजरीवालांना..', उल्हास बापट असं का म्हणाले?

कंपनीच्या कर्मचाऱ्याची कुटुंबासह आत्महत्या 

नाशिकमधील गौळने गावातील बॉश कंपनीत काम करणाऱ्या विजय सहाने यांनी आपल्या कुटुंबासोबत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना बुधवारी उघडकीस आली होती. विजय सहाने हे गेल्या बारा वर्षांपासून बॉश कंपनीत कामाला होते. त्यांनी आपली पत्नी आणि नऊ वर्षाच्या मुलीसोबत आत्महत्या केली. विजयच्या कुटुंबीयांनी बॉश कंपनीवर गंभीर आरोप केले आहेत. गेल्या काही दिवसांपासून विजय सहाने अस्वस्थ होते. याच तणावातून त्यांनी आत्महत्या केल्याचे सांगत कुटुंबीयांनी यासाठी बॉश कंपनीला जबाबदार धरले आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरु आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT