Ajit Pawar: 'वेडेवाकडे विधान करून सरकारला...', शिंदे-फडवणवीसांच्या नेत्यांना अजितदादांनी सुनावलं!

मुंबई तक

ADVERTISEMENT

ajit pawar criticized shinde mla sanjay gaikwad and bjp anil bonde rahul gandhi on reservation maharashtra politics
अजित पवारांनी शिंदे, फडवणवीसांच्या नेत्यांचे टोचले कान
social share
google news

बातम्या हायलाइट

point

संविधानानुसार प्रत्येकाला मते मांडण्याचा अधिकार आहे

point

राग व्यक्त करण्याच्या काही मर्यादा असतात.

point

पण कुठलीही भाषा वापरली जाते

Ajit Pawar News : शिवसेना आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची जीभ छाटणाऱ्या 11  लाखांचं बक्षीस देणार असल्याचं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. गायकवाडांपाठोपाठ भाजपचे खासदार अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी राहुल गांधी यांची जीभ छाटायला नको तर त्याला चटके द्यायला हवेत,असे विधान केले होते. शिंदे, फडणवीसांच्या नेत्यांच्या या विधानावर अजित पवारांनी (Ajit Pawar) त्यांचे कान टोचले आहे. नेमकं अजित पवार काय म्हणाले आहेत? हे जाणून घेऊयात. (ajit pawar criticized shinde mla sanjay gaikwad and bjp anil bonde rahul gandhi on reservation maharashtra politics) 

संजय गायकवाड आणि अनिल बोंडे यांनी राहुल गांधी यांच्यावर केलेल्या टीकेनंतर राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. अशात आता महायुतीच्या बुलढाण्याचा कार्यक्रमात अजित पवारांनी शिंदे, फडणवीसांसमोर त्यांच्या नेत्यांच्या कानपिचक्या घेतल्या.'संविधानानुसार प्रत्येकाला आपापली मते आणि विचार मांडण्याचा अधिकार आहे. पण सत्ताधारी पक्षाच्या कोणत्याही नेत्यांनी वेडेवाकडे बोलून महायुतीच्या घटकपक्षांना अडचणीत आणण्याचे काम करू नये, असे अजित पवार म्हणाले आहेत. अजित पवारांचा रोख हा खासदार अनिल बोंडे आणि शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्यावर होता. 

हे ही वाचा : One Nation One Election: 'मोदी दर्शनाला गेले आणि गणपती पावला केजरीवालांना..', उल्हास बापट असं का म्हणाले?

''मी एक गोष्ट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या साक्षीने सांगेन, प्रत्येकाला आपापली मते आणि विचार मांडण्याचा अधिकार आहे. तो अधिकार घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला आहे. पण कुठल्याही सत्ताधारी किंवा विरोधी असेल, वाचाळविरांनी आपापल्या मर्यादा पाळाव्यात. आपण शिव-शाहूंच्या महाराष्ट्रात राहतोय. कुठेही वेडेवाकडे विधान करुन कुठेही मुख्यमंत्र्यांना, महायुतीच्या घटक पक्षांना अडचणीत आणू नये. ठीक आहे, राग येतो. आम्हालाही येतो. पण राग व्यक्त करण्याच्या काही मर्यादा असतात. त्या संदर्भात भाषा कुठली वापरली जाते'', असा सवाल करत अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे संजय गायकवाड यांच्यावर निशाणा साधला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

''सुसंस्कृत महाराष्ट्र कशी असली पाहिजे ते यशवंतराव चव्हाणांनी शिकवलं आहे. त्या विचारांनी आपण पुढे चाललो आहोत. यशवंतराव चव्हाण यांचा विचार आपल्याला सोडता येणार नाही. भाषा कसली पाहिजे? तर उद्या कुणी आपल्यावर टीका करायला नकोय. बोलताना अनेक प्रकारचे शब्दप्रयोग करता येतात. त्यामुळे महायुतीचं सरकार त्या विचारांचं आहे. जर कुणी एखाद दुसरं काही बोलून गेलं तर त्याला महायुती सरकारचा पाठिंबा आहे, असं समजण्याचं कारण नाही हे देखील मी जाहीरपणे सांगू इच्छित'', असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं.

हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : महिलांनो...तिसऱ्या हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यात जमा झाले का?

    follow whatsapp

    ADVERTISEMENT