One Nation One Election: 'मोदी दर्शनाला गेले आणि गणपती पावला केजरीवालांना..', उल्हास बापट असं का म्हणाले?

मुंबई तक

ADVERTISEMENT

मोदी दर्शनाला गेले आणि गणपती पावला केजरीवालांना..'
मोदी दर्शनाला गेले आणि गणपती पावला केजरीवालांना..'
social share
google news

बातम्या हायलाइट

point

वन नेशन वन इलेक्शनवरुन देशभरात जोरदार चर्चा

point

घटनातज्ज्ञ उल्हास बापटांची मोदी सरकारवर मार्मिक टिप्पणी

point

एकाच वेळी देशात निवडणुका घेणं शक्य होईल का?

Ulhas Bapat: पुणे: वन नेशन वन इलेक्शन यावरून आता देशभरात जोरदार चर्चा सुरू आहेत. देशात एकाच वेळेस सर्व राज्यात निवडणुका घेता याव्यात यासाठी मोदी सरकारने जी कोविंद समिती नेमली होती. तो अहवाल आता केंद्रीय कॅबिनेटने स्वीकारला आहे. पण याचबाबत बोलताना घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी एक मार्मिक अशी टिप्पणी केली आहे. (constitutional expert ulhas bapat poignant comment on prime minister modi while speaking on one nation one election)

वन नेशन वन इलेक्शन याचे राजकीय आणि घटनात्मकदृष्ट्या कसे पडसाद उमटणार यावर बोलताना उल्हास बापट यांनी सविस्तरपणे त्यांचं मत व्यक्त केलं. पण यावेळी त्यांनी अशी एक टिप्पणी केली ज्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

वन नेशन वन इलेक्शनवर उल्हास बापट नेमकं काय-काय म्हणाले?

प्रश्न: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेचा निवडणुका झालेल्या नाही. अशा परिस्थिती वन नेशन वन इलेक्शन शक्य आहे का? 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

उल्हास बापट: तुम्हाला चार राज्यांच्या निवडणुका एकत्र घेता येत नसतील तर 28 राज्यांच्या निवडणुका तुम्ही कशा एकत्र घेऊ शकणार आहात? आपल्याकडे तेवढं लष्कर, पोलीस आहे का? सरकारी नोकर आहेत का? नाही... स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका का झाल्या नाही? याचंही उत्तर त्यांना द्यावं लागेल. कारण त्या निवडणुका घेण्यात काहीही अडचण नव्हती. यामध्ये राजकीय प्रश्न अनेक उद्भवतात. 

काश्मीरमध्ये निवडणुकांसाठी इतर राज्यातील निवडणुका पुढे ढकलाव्या लागत आहेत. 28 राज्यात एकाच वेळी निवडणुका हे नेमकं कसं शक्य आहे? 11 निवडणूक आयुक्तांनी हे सांगितलं आहे की हे शक्य नाही. त्यामुळे तुम्ही जरा तज्ज्ञांचा सल्ला घेत जा ना अधूनमधून... 

ADVERTISEMENT

प्रश्न: वन नेशन वन इलेक्शन याविरोधात जनआंदोलन उभं राहू शकतं का? 

ADVERTISEMENT

उल्हास बापट: मी खरं सांगू का.. मी राजकारणावर कधी बोलत नाही. घटनात्मक जे होतं ते मी तुम्हाला सांगितलं. प्रशासकीय अडचणी आहेत. काही घटनात्मक अडचणी आहेत. पण हे येत्या काळात हे घडेल असं मला वाटत नाही. 

प्रश्न: सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार महाराष्ट्रातील सरकारबाबत पण ही सुनावणी सतत लांबणीवर जात आहे. याचं मुख्य कारण काय आहे. यामागे काही राजकीय प्रभाव आहे? असं तुम्हाला वाटतं? 

उल्हास बापट: मी यावर बोलू शकणार नाही. राजकारणावर मी बोलत नाही. मला एक सहज लक्षात आलं.. कोणी तरी मला व्हॉट्सअॅपवर पाठवलं होतं. जो मला पटला. की, मुख्य न्यायाधीशांच्या घरचा गणपती आहे.. तिथे मोदी दर्शनाला गेले आणि तो पावला केजरीवालांना.. त्यामुळे या राजकारणावर मी काही बोलणार नाही.

प्रश्न: वन नेशन वन इलेक्शन याला जर विरोध करायचा असेल तर त्यासाठी कायद्याची बाजू काय असेल? 

उल्हास बापट: हा कायदा पासच होणार नाही. घटनात्मक बदल होणारच नाही. त्यामुळे पुढचं कशाला बोलायचं?

 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT