डॉक्टर दाम्पत्याचे दत्तक मुलीवर अमानुष अत्याचार, काय आहे प्रकरण?
गुवाहाटीत एका डॉक्टर दाम्पत्याने दत्तक घेतलेल्या 4 वर्षीय मुलीचा अमानुष छळ केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणात बाल शोषण प्रकरणी आसाम पोलिसांनी डॉ.वलीउल इस्लामला अटक केली आहे. तर डॉक्टरची पत्नी संगीता दत्ता फरार आहे.
ADVERTISEMENT
Doctor couple accused assaulting adopted daughter : गुवाहाटीत एका डॉक्टर दाम्पत्याने (Doctor Couple) दत्तक घेतलेल्या 4 वर्षीय मुलीचा अमानुष छळ केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दाम्पत्याने अल्पवयीन मुलीच्या प्रायव्हेट पार्टवर सिगारेट चटके दिल्याची हादरवून टाकणारी माहिती समोर आली आहे. या प्रकरणात बाल शोषण प्रकरणी आसाम पोलिसांनी डॉ.वलीउल इस्लामला अटक केली आहे. तर डॉक्टरची पत्नी संगीता दत्ता फरार आहे. या प्रकरणात संगीता यांना फरार करण्यास मदत करणाऱ्यास मोलकरणीला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (doctor couple accused assaulting adopted daughter pocso under case register guwahati assam story)
ADVERTISEMENT
प्रकरण काय?
गुवाहाटीत राहणाऱ्या डॉ.वलीउल इस्लाम आणि संगीता दत्ता या डॉक्टर दाम्पत्याने 4 वर्षाच्या एका अल्पवयीन मुलीला दत्तक घेतले होते. आता या दाम्पत्यावर मुलीचा छळ केल्याचा आरोप होत आहे. दाम्पत्याने मुलीचे हाथ-पाय बांधून तिला टेरेसवर उन्हात उभे केले होते. या प्रकरणी शेजारी राहणाऱ्या एका महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी डॉक्टरांच्या दाम्पत्याच्या घरी छापा मारत तपास सुरू केला होता.
हे ही वाचा : सीतापूरमध्ये सैराट… नराधम काकाने पुतणीला अंगण्यातच विळ्याने चिरलं!
छाप्यात धक्कादायक खुलासे
अल्पवयीन मुलीला डॉक्टर दाम्पत्याने इमारतीच्या चौथ्या मजल्यावर बंद केले होते. यासोबत अल्पवयीन मुलीच्या प्रायव्हेट पार्टवर जखमेचे आणि चटक्यांचे निषाण सापडलो होते.तिची मेडीकल चाचणी केली असता मुलीच्या प्रायव्हेट पार्टवर सिगारेटचे चटके दिल्याची माहिती गुवाहाटीचे पोलिस आयुक्त दिगंता बराह यांनी दिली. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा आणि डीजीपी जीपी सिंह या प्रकरणावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. या प्रकरणात मेडीकल अहवालावरून डॉक्टर दाम्पत्याविरूद्ध पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे वाचलं का?
या प्रकरणात बाल शोषण प्रकरणी आसाम पोलिसांनी डॉ.वलीउल इस्लामला अटक केली आहे. तर डॉक्टरची पत्नी संगीता दत्ता फरार झाली असून तिने एक व्हिडिओ शेअऱ करत स्पष्टीकरण दिले आहे. या व्हिडिओमध्ये संगीताने बळीचा बकरा बनवल्याचे सांगत,कारकीर्द संपवण्यासाठी कोणीतरी कट रचल्याचा आरोप केला. तसेच डॉक्टर संगीताने तिच्यावर आणि तिच्या पतीवर लावलेले आऱोप फेटाळून लावले. दरम्यान या प्रकरणात पोलिस आता संगीता दत्ताचा शोध घेत आहे. या प्रकरणाचा अधिकचा तपास सुरु आहे.
हे ही वाचा : शेजाऱ्याकडून बायको राहिली गर्भवती; पतीने केलेलं कृत्य ऐकून पोलिसही झाले सुन्न
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT