लातूर हादरलं! डोंगराच्या पायथ्याशी ड्रग्ज फॅक्ट्रीवर DRI चा छापा, आरोपींमध्ये पोलीस?

मुंबई तक

Latur Drugs Case: कारखान्यातून ड्रग्ज बनवण्यासाठीचा मोठ्या प्रमाणात कच्चा माल आणि संपूर्ण लॅब सेटअप जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात डीआरआयने 7 जणांना अटक केली आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

लातूरमध्ये भल्या मोठ्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश

point

DRI ची मोठी कारवाई, कोट्यवधींचा माल जप्त

point

आरोपींमध्ये पोलीस हवालदारही असल्याची माहिती

Latur Drugs Case : लातूर जिल्ह्यात एका मोठ्या ड्रग्ज सिंडिकेटचा पर्दाफाश झाला आहे. महसूल गुप्तचर संचालनालय (DRI) मुंबईच्या पथकाने लातूरच्या रोहिना गावात मेफेड्रोन बनवणाऱ्या कारखान्यावर छापा टाकला. गुप्त माहितीच्या आधारे मंगळवारी हा छापा टाकण्यात आला. हा कारखाना लातूरच्या एका दुर्गम डोंगराळ भागात चालवला जात होता.

हे ही वाचा >> डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतली माघार, पण महाराष्ट्रावर परिणाम... वाचा इंटरेस्टिंग माहिती

डीआरआय अधिकाऱ्यांनी सांगितले की, 11.36 किलो मेफेड्रोन जप्त करण्यात आलं. त्यात कोरड्या स्वरूपात 8.44 किलो आणि द्रव स्वरूपात 2.92 किलो होतं. जप्त केलेल्या ड्रग्जची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत सुमारे 17 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जातं आहे.\

हे ही वाचा >> Personal Finance: शेअर मार्केटचा बाजारच उठला, आता करावं तरी काय?

कारखान्यातून ड्रग्ज बनवण्यासाठीचा मोठ्या प्रमाणात कच्चा माल आणि संपूर्ण लॅब सेटअप जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात डीआरआयने 7 जणांना अटक केली आहे. यापैकी 5 जण कारखान्यात मेफेड्रोन तयार करण्याचे काम करत होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यामध्ये एका पोलिस कॉन्स्टेबलचाही समावेश आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात या औषधाची किंमत 17 कोटी रुपये

सात आरोपींपैकी दोन आरोपींना मुंबईत पकडण्यात आलं आहे. एक आरोपी या आर्थिक पुरवठादार आहे आणि दुसरा त्याचा पेडलर आहे. डीआरआय अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सर्व आरोपींनी मेफेड्रोनचे उत्पादन, आर्थिक मदत आणि पुरवठा केल्याची कबुली दिली आहे. या प्रकरणी एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp