भाऊच भावाच्या जीवावर उठला, 9 वर्षाच्या भावाला डोकं फोडून का संपवलं?
कौंटुबीक वादातून लहान मुलावर राग धरून मोठ्या भावाने 9 वर्षाच्या भावाच्या डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला करून त्याची हत्या केली आहे. निष्पाप मुलाच्या हत्येमुळे आता पोलिसही चक्रावले आहेत.
ADVERTISEMENT

Murder News : छत्तीसगडमधील बालोदमधून 9 वर्षाच्या एका विद्यार्थ्याची हत्या (Student Murder) करून त्याचा मृतदेह एका निर्जनस्थळी संशयास्पदरित्या सापडला होता. चौथी शिकणारा तोरण साहू हा 31 जानेवारी सकाळी शाळेला जातो म्हणून घरातून बाहेर पडला होता. त्यानंतर तो घरी परतलाच नाही. त्याचा शोध घेतल्यानंतर शाळेपासून किमान तीनशे मीटरवर त्याचा मृतदेह (dead body) सापडला होता. त्याचा मृतदेह सापडल्यानंतर मात्र तो दगडाने आणि विटाने ठेचून केला होता. तर त्याच वेळी लोखंडी रॉडनेही त्याच्यावर हल्ला (attack) केल्याचं दिसून येत होतं. ही घटना पोलिसांना समजताच घटनास्थळी दाखल होत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.
शाळेतच झाली हत्या
शाळेला जाणाऱ्या ज्या विद्यार्थ्याची हत्या करण्यात आली आहे, ती घटना अर्जुंदा पोलीस स्थानकातील चीचागावमध्ये झाली आहे. रोजच्यासारख्या नऊ वर्षाचा तोरण हा शाळेला गेला होता. दुपारी जेवल्यानंतर तोरण आणि त्याचे मित्र शाळेजवळ असलेल्या तलावाकडे तो शौचालयासाठी गेले होते. मात्र तलावाकडून त्याचे सगळे मित्र शाळेकडे परतले मात्र तोरण आलाच नाही. तोरण शाळेतून घरी गेला नसल्याने त्याच्या आईन त्याच्या शिक्षकांशी संपर्क साधत तो घरी आला नसल्याचे सांगितले.
पालकांना मानसिक धक्का
तोरण शाळेतून घरी परतला नसल्यामुळे त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर बांधकाम सुरु असलेल्या एका घरात त्याचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर त्याचा मृतदेह सापडल्याचे त्याच्या पालकांनी पोलिसांना सांगितले.
हे ही वाचा >> Uddhav Thackeray : ‘आमचं हिंदुत्व घरातील चूल पेटवणारं आणि तुमचं…’ ठाकरेंनी भाजपला घेरलं
निष्पाप तोरण गेला
बेपत्ता तोरण साहूचा मृतदेह मिळाल्यानंतर पोलिसांनी सगळ्या पातळीवर हत्या का केली गेली त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. वडील टेमन साहू यांनी पोलिसांना सांगितले की, आपल्या मुलाचं कोणाशीही वैर नव्हतं, आणि तो कधी कोणाबरोबर वाद घालत नव्हता.