Crime: 27 वर्षाच्या मुलाची हत्या,विटेने ठेचून घेतला जीव,कारण ऐकून हादरून जालं

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

father killed her son brick over second marriage meerut murder case uttar pradesh crime story
father killed her son brick over second marriage meerut murder case uttar pradesh crime story
social share
google news

उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) मेरठमधून (meerut) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत जन्मदात्या पित्यानेच पोराची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे.27 वर्षीय सचिन असे या मृत तरूणाचे नाव आहे. विशेष म्हणजे या घटनेत पित्याने फिल्मी स्टाईलने सचिनच्या हत्येचा कट रचला आहे. आता नेमकी पित्यावर मुलाची हत्या करण्याची वेळ का आली? आणि हे संपूर्ण घटनाक्रम काय आहे? हे जाणून घेऊयात. (father killed her son brick over second marriage meerut murder case uttar pradesh crime story)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, 22 ऑगस्टला मंगळवारी सचिन त्याच्या हॉस्पिटलमध्ये अॅडमीट असलेल्या आई मुनेश देवीला पाहण्यासाठी घरातून निघाला होता. यावेळी सचिन घरातून तर निघाला मात्र हॉस्पिटलपर्यंत पोहोचलाच नव्हता. त्यामुळे आई मुनेश देवीने त्याच्यासोबत विचित्र घटना घडल्याचा संशय व्यक्त केला होता. या संशयातून मुनेश देवीने पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी तपासाला सुरूवात केली. या तपासा दरम्यान पोलिसांना सचिनचे वडील संजीव (55) यांच्यावर संशय बळावला.पोलिसांनी याच संशयातून संजीव यांना ताब्यात घेऊन चौकशीला सुरुवात केली. या चौकशीत सुरूवातीला संजीवने उडवाउडवीची उत्तर दिली. यानंतर पोलीसी खाक्या दाखवताच आरोपी संजीवने हत्येची कबूली दिली.

हे ही वाचा :Who is Abdul Karim Telgi: ट्रेनमध्ये शेंगदाणे विकणारा ते सर्वात मोठा घोटाळेबाज, काय आहे कहाणी?

असा रचला कट

पोलीस चौकशीत संजीवने सांगितले की, मी माझ्या एका साथिदाराला 5 लाखाची सुपारी देऊन सचिनची हत्या केल्याची कबुली संजीवने दिली. 22 ऑगस्टला मी आणि माझा साथिदार अमितने कोणतातरी बहाणा करून बपारसीच्या जंगलात सचिनला बोलावले. सचिनला आल्यावर आम्ही तिघांनी मिळून जंगलात दारू प्यायली. सचिनला नशा चढलेली पाहून आम्ही त्याच दारूच्या बाटल्यांनी त्याच्यावर डोक्यावर हल्ला करून त्याला जखमी केले. यानंतर सचिनवर विटांनी हल्ला चढवून त्याची हत्या केली. या हत्येनंतर त्याचा मृतदेह हिंडन नदीत फेकून दिला होता.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

संजीवने दिलेल्या माहितीनूसार पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरु केला. या तपासात पोलिसांना घटनास्थळावरून सचिनची बाईक, मोबाईल आणि नबरप्लेट सापडली होती.या बाईकवरून सचिनचा शोध लागू नये यासाठी त्याची नंबरप्लेटही तोडून फेकण्यात आली होती. तसेच पोलिसांनी स्थानिकांच्या आणि पोलिसांच्या टीमच्या मदतीने हिंडन नदीत शोधमोहिम राबवली. या मोहिमेत पोलिसांना सचिनचा मृतदेह सापडला. हा मृतदेह पोलिसांनी आता पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. आता पोस्टमार्टम रिपोर्टमधून हत्येचे कारण समोर येणार आहे.

‘या’ कारणामुळे हत्या

आरोपी संजीव हे लष्करातून सेवानिवृत्त झाले असून सध्या बँकेत गार्डची नोकरी करत आहेत. संजीव यांचे लग्न मुनेश देवी यांच्याशी झाले होते. या लग्नापासून त्यांना सचिन नावाचा मुलगा होता. या लग्नानंतर संजीव आणि मुनेश यांच्यात वाद व्हायला सुरुवात झाली होती. या वादानंतर सजीव आणि मुनेश यांनी वेगवेगळे राहायला सुरूवात केली. साधारण 15 वर्षापासून ते अशाप्रकारे वेगवेगळे राहत होते. या दरम्यान सचिन हा वडील संजीव यांच्यासोबत राहायचा.यानंतर संजीव यांनी दुसरे लग्न करण्याचे ठरवले होते. पण या लग्नाला सचिनचा विरोध होता. तसेच संजीव आणि सचिनमध्ये नेहमीच भांडण व्हायची.यातूनच संजीव यांनी सचिनची फिल्मी स्टाईलने हत्या केली.

ADVERTISEMENT

हे ही वाचा :Chhagan Bhujbal: पवारांवर बोलताच भरसभेत गोंधळ, भुजबळांना कोणी रोखलं; बीडमध्ये काय घडलं?

दरम्यान आता या प्रकरणात पोलिसांनी संजीवसह त्यांचा गुन्ह्यातील साथिदार सचिनला अटक करून त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिकचा तपास पोलीस करीत आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT