Father Murder: आईबद्दल ‘नको ते’ बोलला; अल्पवयीन मुलाने बापाचा जागीच घेतला जीव
Minor boy Father Murder: आईच्या चारित्र्यावर संशय घेणाऱ्या वडिलांची अल्पवयीन मुलानेच हत्या केल्याची धक्कादायक घटना बीड जिल्ह्यात घडली आहे. ज्या प्रकरणी अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
ADVERTISEMENT
Minor Boy killed Father: रोहिदास हातागळे, बीड: आईच्या चारित्र्यावर नेहमी संशय घेत असलेल्या बापाचा अल्पवयीन मुलानेच खून (Murder) केल्याची अत्यंत धक्कादायक घटना बीड (Beed) जिल्ह्यातल्या पूस गावात बुधवार (16 ऑगस्ट) रोजी रात्री 1.30 वाजेच्या सुमारास घडली. घटनेच्या अवघ्या काही तासातच आरोपी मुलगा तोहित याला पोलिसांनी ताब्यात घेतले. खून झालेल्या बापाचे नाव साहेब जानुखाँ पठाण (वय 42 वर्ष) असे आहे. पोटच्या मुलानेच बापाचा खून केल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. (father was always suspicious of mothers character minor boy killed his father beed crime news )
ADVERTISEMENT
नेमकी घटना जशीच्या तशी
अंबाजोगाई तालुक्यातील पुस येथील शमिमबी साहेब पठाण (वय 39 वर्ष) यांच्या फिर्यादीवरून बर्दापूर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेची अधिक माहिती अशी की, फिर्यादी पत्नीवर पती पठाण हे नेहमी चारित्र्यावर संशय घेत होते. तसेच त्याला दारू पिण्याचे व्यसन असल्यामुळे तो दारू पिऊन दररोज पत्नीच्या चारित्र्यावर सातत्याने संशय घ्यायचा.
16 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 7 च्या सुमारास शमिमबी घरी असताना मोठा मुलगा साहिल याने वडिलांना फोन करून जेवणासाठी विचारले. पण जानुखाँ याने शेतात डब्बा घेऊन ये मी येथेच जेवणार आहे आणि सकाळी दूध घरी घेऊन येतो. असे सांगितले.. यानंतर मोठा मुलगा साहिल याने डब्बा तयार करून त्याचा छोटा भाऊ तोहित याच्याजवळ वडिलांना डबा पाठवून दिला.
हे वाचलं का?
हे ही वाचा >> Bandra Terminus Viral Video : मुलाला बेदम मारहाण, वांद्रे स्टेशनवरील प्रकरण काय?
17 ऑगस्ट मध्यरात्री 1.30 ते 2 च्या सुमारास तोहितने घराचा दरवाजा वाजवून घरातील लोकांना मोठ्याने आवाज दिला. त्यावेळी त्याच्या आईने दरवाजा उघडला. तेव्हा तोहित हा घाबरलेल्या अवस्थेत दिसला. त्यावेळी त्याने आईला सांगितले की, ‘वडिलांना जेवण घेऊन गेलो तेव्हा ते दारू पिऊन आले होते. त्यानंतर त्यांनी तुझ्या व माझ्या चारित्र्यावर संशय घेऊन शिविगाळ केली आणि मला मारहाण केली. मी त्यांना समजावून सांगितले पण ते ऐकत नव्हते. पण मला वडील मारू लागल्यामुळे मी तेथे पत्र्याच्या शेडवरील कुर्हाड घेऊन वडिलांच्या डोक्यात, चेहर्यावर व मानेवर वार केले.’
तोहितने ही गोष्ट सांगताच मोठा मुलगा साहिल, सोहेल व तोहित असे तिघेही पळत शेतात गेले. तेव्हा त्यांचे वडील जखमी अवस्थेत पडलेले दिसले. त्यांच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव होत होता. डोक्यात भंयकर रक्तस्त्राव होत असल्याने ते काहीच बोलत नव्हते. त्यामुळे मोठा मुलगा साहिल याने चुलता अंजुम पठाण यांना फोन लावून सांगितले.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Mumbai : सेक्सला नकार… 18 वर्षीय मैत्रिणीचं भिंतीवर आपटलं डोकं, उशीने दाबलं तोंड
यानंतर त्यांनी साहेब पठाण यांना अंबाजोगाईच्या स्वाराती रूग्णालयात नेलं. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सरपंचाने बर्दापूर पोलिसांना माहिती देत पोलिसांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा करून तपासाची चक्रे फिरविली.
ADVERTISEMENT
सकाळी 7 च्या सुमारास चौकशीसाठी बोलवलेल्या चौघांपैकी त्यांच्या एका मुलानेच खून केल्याचं पोलिसांना जवाबात सांगितले. अंबाजोगाईचे अपर पोलीस अधिक्षक कविता नेरकर यांनी घटनास्थळाला भेट दिल्यानंतर बर्दापूर पोलिसांनी तपासाची चक्रे जलद गतीने फिरविली आणि घटनेच्या पाच तासातच अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतलं. या प्रकरणाचा पुढील तपास बर्दापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक महिंद्रसिंग ठाकूर हे करीत आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT