Crime: विद्यार्थ्याला पाठवायची स्वत:चे अश्लील Video, त्यानंतर शिक्षिका करायची..

मुंबई तक

ADVERTISEMENT

female teacher arrested send obscene videos photos minor student school crime
female teacher arrested send obscene videos photos minor student school crime
social share
google news

Female Teacher Crime: पेनसिल्व्हेनिया (अमेरिका): आपल्या विद्यार्थ्यांना अश्लील फोटो आणि व्हिडिओ (Offensive Photos Videos) पाठवल्याप्रकरणी एका महिला शिक्षिकेला (Female Teacher) अटक करण्यात आली आहे. 37 वर्षीय शिक्षिकेवर एका विद्यार्थ्याचे लैंगिक शोषण (sexual abuse) केल्याचा आरोप आहे. पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या कारमध्येच तिने विद्यार्थ्याशी शारीरिक संबंध ठेवल्याचं समोर आलं आहे. या महिला शिक्षिकेला अटक करुन तिच्यावर न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता. मात्र, सध्या शिक्षिका ही जामिनावर बाहेर आहे. हे संपूर्ण प्रकरण अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनियाचे आहे. (female teacher arrested send obscene videos photos minor student school crime)

नेमकी घटना काय?

डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, आरोपी महिला शिक्षिकेचे नाव मेगन कार्लिस्ले आहे. तिच्यावर 15 वर्षीय विद्यार्थ्याशी बळजबरीने संबंध ठेवल्याप्रकरणी तिच्यावर गुन्हा दाखल करण्याता आला आहे. नुकतंच कोर्टात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात तिने पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या कारमध्ये विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याचे सांगण्यात आले. याशिवाय ती दोन विद्यार्थ्यांना अनेक महिने अश्लील मजकूरही पाठवत असल्याचा तिच्यावर आरोप करण्यात आला आहे.

चौकशीदरम्यान पीडित विद्यार्थ्याने पोलिसांना सांगितले की, त्याने शिक्षिकेकडे गॅझेट मागितले होते. त्या बदल्यात कार्लिस्ले त्याला गॅजेट्ससह काही पैसेही दिले. तसंच दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण देखील त्याच्यासोबतच केलं. त्यानंतर सोशल मीडियावरुन तिने वैयक्तिक फोटो आणि व्हिडिओंची मागणी करण्यास सुरुवात केली. कधी-कधी ती तिचे अश्लील फोटोही पाठवत असे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

पोलिसांचा तपास सुरू

कार्लिस्लेची ही कृतीच या प्रकरणात पुरावा म्हणून महत्त्वाची गोष्ट ठरली आहे. जरी, तिने तिचे सर्व चॅट्स आणि कंटेट डिलीट केले असले तरीही, तपास पथकाने तज्ज्ञांच्या मदतीने सर्वकाही परत मिळवलं आहे. नंतर, कार्लिस्लेवर एका अल्पवयीन मुलाशी बळजबरीने लैंगिक संबंध ठेवणे, संस्थेत गैरवर्तन करणे, लैंगिक शोषण आणि सोशल मीडियावर असभ्य वर्तन केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत न्यायालयात खटला सुरू आहे. सध्या ती जामिनावर आहे.

या प्रकरणी शाळा प्रशासनाचे म्हणणे आहे की, आरोपी महिला शिक्षिकेला कामावरून काढून टाकण्यात आले आहे. तसेच तिचा शिकवण्याचा परवानाही रद्द करण्यात आला आहे. तसेच शाळा प्रशासन तपासात सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं. मात्र, या प्रकरणात आणखी काही विद्यार्थी बळी पडलेले असू शकतात, असे तपास अधिकाऱ्यांचे मत आहे. त्यामुळे महिला शिक्षिकेबाबत अधिक चौकशी सध्या पोलीस करत आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT