Firing: ‘ये सब PAK से ऑपरेट हैं…’, जयपूर-मुंबई ट्रेनमधील ‘तो’ व्हिडिओ व्हायरल

रोहित गोळे

ADVERTISEMENT

The firing in the Jaipur-Mumbai Express has created a sensation throughout the country. Meanwhile, the police officer who died in the firing was posted in Dadar RPF.
The firing in the Jaipur-Mumbai Express has created a sensation throughout the country. Meanwhile, the police officer who died in the firing was posted in Dadar RPF.
social share
google news

मुंबई: जयपूरहून मुंबईला जाणाऱ्या ट्रेनमध्ये सोमवारी (31 जुलै) झालेल्या हत्याकांड (Firing in Train) प्रकरणाला आता राजकीय वळण लागत आहे. चालत्या ट्रेनमध्ये झालेल्या चार जणांच्या हत्येने राजकीय वळण घेतले असून, त्यावरून सोशल मीडियावर देखील जोरदार चर्चा सुरू आहे. सोमवारी सकाळी जयपूर सुपरफास्ट एक्स्प्रेस ट्रेनमध्ये एका कॉन्स्टेबलने गोळीबार करून एएसआयसह अन्य तीन जणांची हत्या केली होती. या घटनेचा व्हिडीओही व्हायरल झाला असून, त्यात आरोपी हवालदार जे काही बोलताना ऐकू येत आहे, त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. आरोपी हल्लेखोराने पाकिस्तानचे देखील नाव घेतले आहे. (firing in train jaipur mumbai express accused chetan singh video goes viral live marathi news in maharashtra)

घटना कधी आणि कशी घडली?

समोर आलेल्या माहितीनुसार, सोमवार (31 जुलै रोजी) पहाटे 05:00 ते 05:15 च्या दरम्यान, ट्रेन क्रमांक 12956 जयपूर सुपरफास्ट एक्सप्रेस ट्रेन मुंबईच्या दिशेने जात होती. वापी ते बोरिवली रेल्वे स्थानकादरम्यान ही गाडी धावत होती. ट्रेनमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसाठी चेतन सिंग (30 वर्ष) तैनात होता. या ट्रेनमध्ये रेल्वे प्रोटेक्शन फोर्सचे ASI टिकाराम मीणा हे देखील तैनात होते.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वप्रथम चेतनने B 5 कोचमधील एएसआयवर गोळीबार केला. त्यानंतर त्याच डब्यातील अन्य एका प्रवाशावर गोळीबार केला. यानंतर चेतन पॅंट्री कारच्या दिशेने निघाला आणि त्याने येथे जाणाऱ्या एका प्रवाशावर गोळीबार केला आणि त्यानंतर पॅन्ट्री कारच्या पुढील बोगी S6 मध्ये जाऊन तिसर्‍या प्रवाशावर गोळीबार केला. या गोळीबाराच्या घटनेत, रेल्वे सुरक्षा दलाचे एएसआय/ टिकाराम मीणा यांच्यासह 3 रेल्वे प्रवाशांचा मृत्यू झाला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला अन्…

या घटनेचा एक व्हिडीओही आता व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आरोपी हल्लेखोर चेतन पाठमोरा उभा आहे. त्याच्या पायाजवळ एक मृतदेह पडलेला आहे. चेतन यावेळी काहीतरी बोलतोय. पण यामध्ये सर्व काही स्पष्ट ऐकू येत नाही, जो आवाज ऐकू येतो, त्यात तो असं म्हणतोय की, ‘हे सगळे पाकिस्तानमधून ऑपरेट होत आहेत.’

या घटनेनंतर मीरा रोड रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे थांबवण्यात आली. प्रवाशांनी ट्रेनमधील साखळी ओढून ही ट्रेन थांबवली. यानंतर रेल्वे प्रोटेक्शन फोर्सचा जवान चेतन सिंह आपल्या हातातील बंदूक घेऊन थेट रेल्वे रुळावरून पळू लागला. मीरा रोड रेल्वे स्थानकावरील ड्युटीवर असलेल्या पोलीस (GRP) आणि रेल्वे संरक्षण दलाच्या (RPF)कर्मचाऱ्यांनी तात्काळ त्याला पकडले आणि शस्त्रासह ताब्यात घेतले. या घटनेबाबत बोरिवली रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

तीन मृतांची ओळख पटली, एकाची ओळख पटवणं सुरू

या घटनेतील मृत व्यक्तींपैकी 3 मृत व्यक्तींची ओळख पटली आहे.

ADVERTISEMENT

  • ASI टिकाराम मीणा (Resb स्टाफ, वय 58 वर्षे)
  • अजगर अब्बास शेख (मधुबनी बिहार, वय 48 वर्षे)
  • अब्दुल कादरभाई मोहम्मद हुसेन मानपुरवाला (नालासोपारा, पालघर वय 62 वर्षे) अशी मृतांची नावे आहेत.
  • चौथ्या व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही.

ओवेसी म्हणाले, ‘हा दहशतवादी हल्ला’

या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाने पेट घेतला आहे. AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी ट्विट केले की, ‘हा एक दहशतवादी हल्ला आहे ज्यात मुस्लिमांना खास लक्ष्य करण्यात आले आहे. त्यांच्या विरोधात सतत मुस्लिमविरोधी आणि द्वेषपूर्ण भाषणांचा हा परिणाम आहे. पंतप्रधान मोदींना टॅग करत त्यांनी प्रश्न केला की, हे संपविण्यासाठी आरोपी #RPFJawan ला भाजप उमेदवार करणार का? त्याच्या जामिनाला सरकार पाठिंबा देणार का? त्याची सुटका झाल्यावर त्याला हार घालण्यात येईल का?

हा व्हिडीओ शेअर करताना भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बीवी यांनी लिहिले की, ‘देशाला द्वेषाच्या आगीत फेकून राज्यकर्त्यांनी कोणत्या टप्प्यावर उभे केले आहे..? जयपूर-मुंबई ट्रेनमधील वेदनादायक हत्याकांडाचा हा व्हिडीओ आणि बोलला गेलेला प्रत्येक शब्द देशाच्या सद्यस्थितीचे वर्णन करण्यासाठी पुरेसा आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT