Kolhapur: ‘हात-पाय तोडून गोळ्या घाला’, शिंदेंच्या नेत्याचा मारहाणीचा Video व्हायरल

ADVERTISEMENT

Former MLA Rajesh Kshirsagar threatened to beat up his neighbors and kill them
Former MLA Rajesh Kshirsagar threatened to beat up his neighbors and kill them
social share
google news

Rajesh Kshirsagar : कार्यकर्त्यांचे वाढदिवस आणि पार्ट्यामुळं संकुलातील रहिवाशी (resident) त्रस्त झाल्याने त्या विरोधात वारंवार विचारणा करणार्‍यांना माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्याकडून मारहाण करण्यात आली. यावेळी त्या कुटुंबाला धमकीही देण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याबाबत विचारणा करण्यासाठी गेलेल्या राजेंद्र वरपे यांना क्षीरसागर कुटुंबीयांनी मारहाण करून त्यांना ठार मारण्याची धमकीही (Threat to kill) देण्यात आली. नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्याकडून आपल्या कुटुंबाचा घातपात होण्याची शक्यता असून त्यांच्याकडील पिस्तुल परवाना रद्द करण्याची मागणीही राजेंद्र वरपे (Rajendra Varape) आणि कुटुंबीयांनी पत्रकार परिषदेद्वारे केली आहे.

टेरेसवर गोंगाट

कोल्हापुरातील शनिवार पेठेत शिवगंगा संकुल असून त्या रहिवाशी संकुलात 30 ते 35 फ्लॅटधारक राहतात. या इमारतीच्या सहाव्या मजल्यावर माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासह अन्य 3 कुटुंबीय राहतात. या इमारतीच्या टेरेसवर राजेश क्षीरसागर आणि त्यांचे कार्यकर्ते राजकीय पार्ट्या आणि रात्री उशिरापर्यंत वाढदिवस साजरे करतात. 8 तारखेच्या रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमाराला टेरेसवरील गोंगाटामुळं संतप्त झालेल्या राजेंद्र वरपे यांनी राजेश क्षीरसागर यांना याबाबत विचारणा केली.

हे ही वाचा >> MP Chief Minister: मोहन यादवांनी मुख्यमंत्री पदाची खुर्ची कशी मिळवली? वाचा Inside Story

कार्यकर्त्यांना चिथावणी

यावेळी तिथे असलेल्या अनोळखी व्यक्ती, कामगार आणि केटरिंगचं काम करणार्‍यांनी वरपे यांना प्रत्युत्तरही दिले. त्यानंतर वरपे लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात जाऊन त्यांनी पोलिसांना तिथं पाठवले. मात्र तक्रार देण्यासाठी गेल्याचा राग धरुन, माजी आमदार राजेश क्षीरसागर, ऋतुराज क्षीरसागर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मुलगा शौर्य, मुलगी सिध्दी आणि वरपे यांना शिवीगाळ करुन मारहाण करण्यात आली. यावेळी त्या कुटुंबीयांना हातपाय तोडून गोळ्या घालण्याची धमकीही दिली आहे. तसेच याला सोडू नका असं म्हणून क्षीरसागर यांनी कार्यकर्त्यांना चिथावणी दिल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

घटना सीसीटीव्हीत कैद

राजेश क्षीरसागर यांच्या धमकीमुळे आणि मारहाणीमुळे वरपे कुटुंब घाबरून घरात गेले. त्यावेळी त्या सर्वांना त्यांनी मारहाण केली. स्थानिक पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून तक्रार घेण्यासाठी वरपे यांना पोलिसात घेऊन गेले. वरपे कुटुंबीयांनी झालेला हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत रेकॉर्ड झाल्याचेही सांगितले आहे. त्यामुळे पोलिसांनी फुटेज पाहून गुन्हा दाखल करत असल्याचे त्यांनी सांगितले मात्र अजूनही गुन्हा दाखल झालेला नाही. तसेच तक्रार दिल्यानंतरच गुन्हा दाखल करत असल्याचेही पोलिसांनी सांगितले. वरपे कुटुंबीयांनी क्षीरसागरांवर दबाबतंत्राचा वापर होत असून, आपण राहता फ्लॅट सोडून जावं त्यासाठी क्षीरसागर कुटुंबीय जाणूनबुजून कुटुंबाला टार्गेट करत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

टोळक्याविरोधात दोन हात

राज्य नियोजन महामंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या दबावाखाली यंत्रणा काम करत आहे. त्यामुळं या गुंडांकडून कुटुंबीयांच्या जीविताला धोका असल्याचं राजेंद्र वरपे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. यावेळी रवी इंगवले यांनी आपण वरपे कुटुंबीयांच्या पाठीशी ठामपणे उभं राहणार आहे. दादागिरी करणार्‍या क्षीरसागरच्या टोळक्याविरोधात दोन हात करण्याची आपली तयारी असल्याचेही त्यांनी सांगितले. हे प्रकरण पोलिसांनी गांभीर्यानं घेतलं नाही तर राज्यपातळीवरील तपास यंत्रणेकडं दाद मागणार असल्याचं ठाकरे गटाचे शहरप्रमुख रवीकिरण इंगवले यांनी सांगितलं. या पत्रकार परिषदेला राजेंद्र वरपे, सिध्दी वरपे, शौर्य वरपे, माजी नगरसेवक धनंजय सावंत उपस्थित होते. पत्रकार परिषदेनंतर शौर्य वरपे याने राजेश क्षीरसागर यांच्या मुलावर चाल केल्याबद्दल त्याचा शिवसेना शहरप्रमुख रवीकिरण इंगवले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> प्रियकराच्या आईला खांबाला बांधलं अन् विवस्त्र करून…गर्लफ्रेंडच्या कुटुंबीयांचं सैतानी कृत्य

    follow whatsapp

    ADVERTISEMENT