Gadchiroli Crime : 5 जणांच्या हत्याकांडात सूनेच्या मित्राची एन्ट्री, तपासात काय आढळलं?

प्रशांत गोमाणे

गडचिरोली हत्याकांड प्रकरणात तिसऱ्या आरोपीची एन्ट्री झाली आहे. हा तिसरा आरोपी सुन संघमित्रा कुंभारे हिचा वर्गमित्र आहे. त्याचे नाव 25 वर्षीय अविनाश ताजणे आहे. तो बुलढाणा जिह्यातील खामगाव येथील रहिवाशी आहे.

ADVERTISEMENT

gadchiroli mass murder thallium poisoning case police arrestes sanghamitra friend avinash tanjane accused roza ramteke
gadchiroli mass murder thallium poisoning case police arrestes sanghamitra friend avinash tanjane accused roza ramteke
social share
google news

Sanghamitra Kumbhare Gadchiroli mass murder case : गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातल्या महागाव येथे 20 दिवसात एकाच कुटुंबातील पाच व्यक्तींचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या घटनेचा कसून तपास केला असता पाचही जणांवर विषप्रयोग करुन त्यांची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. या प्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून घरातील सुनेला (sanghamitra kumbhare) आणि तिच्या मामीला अटक केली होती. या सर्व घडामोडीनंतर आता पोलिसांच्या हाती मोठा पुरावा लागला आहे. पोलिसांनी या प्रकरणात सुनेच्या मित्राला अटक केली आहे. त्यामुळे या घटनेला नवीन वळण मिळालं आहे. (gadchiroli mass murder thallium poisoning case police arrestes sanghamitra friend avinash tanjane accused roza ramteke)

कुटुंबातील पाच नातेवाईकांवर विषप्रयोग करून हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी आधीच सुन संघमित्रा कुंभारे (sanghamitra kumbhare) आणि तिची मामी रोजा रामटेक हिला अटक केली होती. या अटकेनंतर आता या प्रकरणात तिसऱ्या आरोपीची एन्ट्री झाली आहे. हा तिसरा आरोपी सुन संघमित्रा कुंभारे हिचा वर्गमित्र आहे. त्याचे नाव 25 वर्षीय अविनाश ताजणे आहे. तो बुलढाणा जिह्यातील खामगाव येथील रहिवाशी आहे. आरोपी ताजणेला 27 ऑक्टोबरला रात्री 10 वाजता अटक करण्यात आली आहे, अशी माहिती गडचिरोलीचे अप्पर पोलीस अधिक्षक यतीश देशमुख यांनी दिली.

हे ही वाचा : Ajit Pawar Health : अजित पवारांना डेंग्यू, प्रफुल्ल पटेलांनी काय दिली माहिती?

तिसरा आरोपी संघमित्राचा वर्गमित्र

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथून अटक झालेला अविनाश ताजणे हा आरोपी सुन संघमित्राचा बालपणीचा वर्गमित्र आहे. त्यामुळे लग्न झाल्यापासून सासरी होणाऱ्या जाचाची माहिती संघमित्रा वेळोवेळी अविनाशला द्यायची. तसेच या हत्याकांडात संघमित्राने अविनाशची मदत मागितली होती. विशेष म्हणजे,ज्या विषाचा वापर करून संघमित्राने तिच्या सासरच्या कुटुंबियांची हत्या केली, ते विष आणि इतर ऑर्गेनिक प्रकारचं विष अविनाषनेच कूरिअर व इतर मार्गाने तिला महागावला पाठवले होते.

दरम्यान आता पोलिसांनी विष खरेदी केल्याचे तांत्रिक पुरावे हस्तगत करत आरोपी अविनाशला अटक केली आहे. या अटकेनंतर पोलिसांनी अविनाश ताजनेची चार दिवसांची पोलीस कोठडी मिळवली आहे. याचसोबत संघमित्रसह रोजा रामटेक यांच्याविरूद्ध अतिरीक्त चार दिवसाची कोठडी मिळाली आहे, अशी माहिती यतीश देशमुख यांनी दिली. आता या प्रकरणात पोलीस अविनाश आणि संघमित्रा हे फक्त मित्र आहेत की त्यांच्यात आणखीण कोणतं नातं आहे? याचा तपास करतेय. यासोबत या घटनेबाबत आणखीण कोणते धागेदोरे हाती लागतायत का, याचा तपास करतेय.

हे वाचलं का?

    follow whatsapp