ससूनमधून आरोपी फरार! मोहोळच्या पत्नीला दिली होती जीवे मारण्याची धमकी

मुंबई तक

गुंड शरद मोहोळची हत्या झाल्यानंतर आता पुन्हा एकदा त्याच्या पत्नीला जीवे मारण्याची धमकी मिळाल्याने त्या प्रकरणाची जोरदार चर्चा होऊ लागली आहे. पत्नीला दिलेल्या धमकी प्रकरणी संबंधित आरोपीलाही ताब्यात घेण्यात आले होते, मात्र त्याने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन तो ससून रुग्णालयातून पसार झाला आहे.

ADVERTISEMENT

Marshall Lewis Leelakar
pune crime
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मोहोळच्या पत्नीला धमकी देणारा फरार

point

मोहोळच्या पत्नीला धमकी देणारा ससूनमधून पळाला

point

ससूनमधून आणखी एक आरोपी फरार

Pune Crime: गँगस्टर शरद मोहोळची (Sharad Mohol) हत्या (Murder) करण्यात आली होती, त्यानंतर आता त्याची पत्नी स्वाती मोहोळला (Swati Mohol) जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्या धमकी प्रकरणी एकाला अटक करण्यात आलेला व्यक्ती रुग्णलयातून फरार झाला आहे. रुग्णालयात त्याच्या आरोग्य तपासणीसाठी घेऊन गेलेले असतानाच तो पोलिसांच्या हातातून फरार झाला आहे.  

सोशल मीडियावरून धमकी

अधिकाऱ्याने सांगितले की, सायबर पोलिसांनी शुक्रवारी मार्शल लुईस लीलाकर नावाच्या आरोपीला अटक केली. ते म्हणाले, लीलाकरने सोशल मीडियावर स्वाती मोहोळ हिला मुन्ना पोलकर नावाने जीवे मारण्याची धमकी दिली होती. सायबर पोलिसांनीही तात्काळ कारवाई करत त्याला ताब्यात घेतले होते, मात्र त्याने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन तो पसार झाला.

मार्शल लुईसने दिली धमकी 

या घटनेची माहिती देताना सायबर पोलिसांनी सांगितले की, शुक्रवारी मार्शल लुईस लीलाकर नावाच्या आरोपीला ताब्यात घेण्यात आले होते. मार्शल लुईस लीलाकरने स्वाती मोहोळ यांना मुन्ना पोलकर नावाने सोशल मीडियावरून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले होते.

सायबर पोलिसांची कारवाई

स्वाती मोहोळ यांना धमकी मिळाल्याची माहिती पोलिसांना मिळाल्या नंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. सोशल मीडियावर कुठेन मेसेज पाठवण्यात आले आहेत  ? त्याची माहिती घेऊन आरोपीला ताब्यात घेतले होते. ताब्यात घेतल्यानंतर त्याने आरोग्याच्या समस्या सांगून त्याने रुग्णालयात जाण्याची विनंती केली होती. त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

ओपीडीमधूनच फरार

आरोपीचं डोकं दुखतं म्हणून त्याला रुग्णालयात ओपीडीमध्ये दाखल करण्यात आले. मात्र त्याच वेळी तो पळून जाण्यात यशस्वी झाल्याचेही यावेळी पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी आता बंडगार्डन पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी आरोपीचा शोध घेमयाचं काम सुरु केले आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp