Mumbai Crime : येरूणकरला फोटो स्टुडिओतच का घातल्या गोळ्या? गँगवारची Inside Story

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

gangster sumit yerunkar murder 16 round firing four accused arrested azad galli chunabhatti mumbai crime news
gangster sumit yerunkar murder 16 round firing four accused arrested azad galli chunabhatti mumbai crime news
social share
google news

Gangster Sumit Yerunkar Murder Story : मुंबईला गँगवार काही नवीन नाही, अशा गँगवाराच्या घटना नेहमीच घडतच असतात. अशाच एका गँगवाराच्या घटनेने सध्या मुंबई हादरली आहे. चुन्नाभट्टीच्या (Chunabhatti) आझाद गल्लीत (Azad Galli) रविवारी गँगवाराची घटना घडली होती. या गँगवारमध्ये दिवसाढवळ्या तब्बल 16 राऊंड फायरींग करण्यात आली होती. या अंदाधुंद गोळीबारात जेलमधून निर्दोष सुटून आलेल्या कुख्यात गुंड सुमित येरूणकरची (Sumit Yerunkar) हत्या करण्यात आली. दरम्यान या सुमित येरूणकरची हत्येमागे कुणाचा हात आहे, आणि या हत्येची नेमकी इनसाईड स्टोरी नेमकी काय आहे, हे जाणून घेऊयात. (gangster sumit yerunkar murder 16 round firing four accused arrested azad galli chunabhatti mumbai crime news)

ADVERTISEMENT

कुख्यात गुंड सूमित ऊर्फ पप्पू येरूणकरला 2016 साली हत्येच्या प्रयत्न आणि खंडणीची आरोपाखाली तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. तब्बल 8 वर्ष जेलमध्ये काढल्यानंतर सूमितची नूकतीच निर्दोष सुटका झाली होती. सूमितच्या सूटकेने त्याच्या गँगमध्ये चांगलाचा उत्साह होता. सूमितने जेलमधून बाहेर आल्यानंतर त्याने याच परिसरात नवीन ऑफिस थाटले होते. या ऑफिसचे लवकरच तो उद्घाटनही करणार होता.

हे ही वाचा : Amol kolhe : अजित पवार खासदार कोल्हे यांचा करणार ‘विजय शिवतारे’, 2019 ची पुनरावृत्ती होणार…

सूमित येरूणकरचा येत्या 2 जानेवारीला वाढदिवस होता.या वाढदिवसानिमित्त शहरभर बॅनर लावण्यात येणार होते.यासाठी सूमित येरूणकर वाढदिवसाच्या फोटोशूट करण्यासाठी स्टूडीओत गेला होता. यावेळी त्याच्यासोबत आकाश खंडागळे, मदन पाटील,रोशन खंडागळे आणि सूमितची मुलगी तृषा शर्मा देखील होती. यावेळी स्टूडिओत फोटो काढत असताना चार आरोपींनी घटनास्थळी दाखल होऊन सूमित येरूणकरवर अंदाधुंद फायरींग केली होती. तब्बल 16 राऊंड फायरींगमध्ये सूमित येरूणकरची हत्या करण्यात आली होती. तर त्याचे साथिदार आणि मुलगी गंभीर जखमी झाले होते.

हे वाचलं का?

चुन्नाभट्टीत घडलेल्या अंदाधुंद गोळीबाराने मुंबईत एकच खळबळ माजली होती. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी 9 संयुक्त पथके नेमली होती. या पथकाने 8 तासांतच सूमित येरूणकरची हत्या केलेल्या चारही आरोपींना गजाआड केले होते. ागर सावंत. सुनील ऊर्फ सन्नी पाटील, नरेंद्र ऊर्फ नऱ्या पाटील, आशुतोष ऊर्फ बाबू देवदास गावण अशी या आरोपींची नावे आहेत. हे चारही आरोपी चुन्नाभट्टी परिसरातील रहिवाशी आहेत.

हे ही वाचा : Opinion Poll 2024 : शिंदे-पवारांची साथ… भाजपवरच ‘बुमरँग’! ओपिनियन पोलचा अर्थ काय?

दरम्यान या आरोपींचा सूमित येरूणकरशी पुर्वीचा काही वाद होता. या वादातून त्यांनी सूमित येरूणकरची हत्या केली आहे. विशेष म्हणजे सूमितवर गोळ्या झाडणारे हे सर्व आरोपी गिरणी कामगारांची मुले आहेत. 2016 साली ज्या बिल्डरवर सूमित येरूणकरने गोळ्या झाडून हत्या करण्याचा प्रयत्न केला होत. त्याच बिल्डरने बनवलेल्या एसआरए इमारतीत आरोपी वास्तव्यात होते. 2016 च्या त्या घटनेचा बदला म्हणून चुन्नाभट्टीचा हा प्रकार घडल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलिसांनी या प्रकरणात आता चारही आरोपींना न्यायालयात हजर केले होते. यावेळी त्यांना 12 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली. या प्रकरणाचा अधिक तपास सूरू आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT