Washim : गुप्त धनाच्या लालसेपोटी गमावला जीव, मित्रांनी मिळून…,वाशिममध्ये काय घडलं?
यवतमाळ जिल्ह्यातील दारवा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, सप्टेंबर महिन्याच्या 2 तारखेला पोलीस स्टेशनमध्ये एक तरूण बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली होती. या नोंदीनंतर 4 दिवसांनी एका विहिरीत तरूणाचा मृतदेह सापडला होता.
ADVERTISEMENT
वाशिम (Washim) जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत चार मित्र गुप्त धनाचा शोध घेत होते. हा शोध घेत असताना एका तरूणाचा अपघाती मृत्यू झाला होता. या तरूणाच्या मृत्यूमुळे अडचणीत येण्याच्या भितीपायी त्याच्या इतर मित्रांनी मृतदेहाची विल्हेवाट लावली होती. कारंजा शहरात ही घटना घडली होती. आता महिन्याभरानंतर या हत्येचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे, तसेच त्यांच्याविरोधात यवतमाळच्या दारवा पोलीस ठाण्यात जादुटोणा कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिकचा तपास पोलीस करीत आहेत. (greed for secret money one youth dies washim crime story yavatmal darwa police investigate)
ADVERTISEMENT
यवतमाळ जिल्ह्यातील दारवा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, सप्टेंबर महिन्याच्या 2 तारखेला पोलीस स्टेशनमध्ये एक तरूण बेपत्ता झाल्याच्या तक्रारीची नोंद करण्यात आली होती. या तक्रारीच्या 4 दिवसांनी एका विहिरीत तरूणाचा मृतदेह सापडला होता. हा मृतदेह त्याच बेपत्ता तरूणाचा होता. त्यानुसार पोलिसांनी मृतदेह विहिरीतून बाहेर काढून पोस्टमार्टम रिपोर्टसाठी पाठवत घटनेचा तपास सूरू केला होता.या प्रकरणात मृत्युपुर्वी तरूणाला ज्या मित्रांसोबत पाहिले गेले होते. त्या तरूणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरु केली होती. या चौकशीत तरूणांनी धक्कादायक खूलासे केले आहेत.
हे ही वाचा : Guardian Minister: अजित पवारांपुढं भाजप नमलं, दादांनी ‘हवं ते’ घेतलं; पालकमंत्र्यांची नवी यादी जाहीर!
आरोपींनी पोलिसांना दिलेल्या माहितीनूसार, कारंजा शहरातील राममंदिरासमोर जीर्ण अवस्थेत एक घर आहे. या घरात 4 मित्र गुप्त धन शोधायला गेले होते. या चारही तरूणांसोबत त्या घराचा मालक देखील उपस्थित होता. घरात गुप्त धनाचा शोध सुरू करण्यापूर्वी मित्रांनी घरात पुजा केली होती. या पुजेनंतर घरात खोदकामाला सुरुवात करण्यात आली. या दरम्यान मित्रांनी घरात एक मोठा खड्डा खणला होता.
हे वाचलं का?
हा खड्डा खणल्यानंतर त्यांच्यातील एक तरूण खड्डयात उतरला होता. या दरम्यान अचानक त्याच्या अंगावर घराचा अर्धा भाग कोसळला. ज्यामुळे ढिगाऱ्याखाली दबुन त्याचा जागीच मृत्यू झाला. या संपूर्ण घटनेने मृत तरूणासोबत असलेले इतर मित्र घाबरले होते. त्यामुळे तरूणाच्या मृत्यू प्रकरणाने अटकेच्या भितीने मित्रांनी त्याचा मृतदेह यवतमाळच्या दारवा शहरातील एका विहिरीत फेकून दिला होता.या घटनेनंतर त्याचे मित्र फरार झाले होते.
हे ही वाचा : India Today conclave mumbai : महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बदलणार? फडणवीसांचं थेट उत्तर; म्हणाले…
दरम्यान आरोपी मित्रांनी दिलेल्या माहितीची उलट तपासणी करण्यासाठी यवतमाळ जिल्ह्याची दारवा पोलीस वाशिममध्ये दाखल झाली होती. दारवा पोलिसांनी जीर्ण झालेल्या त्या घराची तपासणी केली असता. त्या घरात पुजा विधी आणि खोदकामाचे साहित्य सापडले होते.
ADVERTISEMENT
पोलिसांनी आता या प्रकरणात दोन तरूणांना अटक केली आहे. तसेच जादुटोणा कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिकचा तपास पोलीस करीत आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT