हत्येपूर्वी अशरफने नाव घेतलेल्या गुड्डू मुस्लिमला नाशिकमधून अटक, सत्य काय?
एका प्रश्नाला उत्तर देताना ‘मुख्य गोष्ट ही आहे की, गुड्डू मुस्लिम…’, हे एवढेच शब्द अशरफ बोलला आणि त्यानंतर हल्लेखोरांपैकी एकाने अतिक आणि अशरफच्या डोक्यात पिस्तुलाने गोळी झाडली.
ADVERTISEMENT
नाशिक : उमेश पाल (Umesh Pal) खून प्रकरणातील आरोपी माफिया अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांची प्रयागराजमध्ये 15 एप्रिलला गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हत्येनंतर संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली आहे. दोन्ही आरोपींची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयात नेले जात असताना पोलीस बंदोबस्तात घुसून हल्लेखोरांनी गोळीबार केला. अंदाधुंद गोळीबारामुळे पोलिसांमध्येही एकच गोंधळ उडाला. अनेक गोळ्या लागल्याने अतिक आणि अशरफ हे जागीच मृत्यूमुखी पडले. (Guddu Muslim was arrested in Nashik? Wha fact, read detailst is fact, read details)
ADVERTISEMENT
यावेळी पोलीस बंदोबस्तामध्ये माध्यमांशी बोलताना अतिकचा भाऊ अशरफ प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी पुढे आला. एका प्रश्नाला उत्तर देताना ‘मुख्य गोष्ट ही आहे की, गुड्डू मुस्लिम…’, हे एवढेच शब्द अशरफ बोलला आणि त्यानंतर हल्लेखोरांपैकी एकाने अतिक आणि अशरफच्या डोक्यात पिस्तुलाने गोळी झाडली. एवढेच नाही तर त्याच्या अन्य दोन साथीदारांनी दोघांनाही लक्ष्य करून अनेक राऊंड फायर केले.
Atiq Ahamad : सनी, लवलेश आणि अरुण; तिघांनी अतिक-अशरफची का केली हत्या?
या हत्येनंतर गुड्डू मुस्लिम पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. तसं तर 24 फेब्रुवारीपासूनच उमेश पाल यांच्या हत्येप्रकरणी पोलीस गुड्डू मुस्लिमचा शोध घेत आहेत. उमेश पाल हत्येप्रकरणी गुड्डू मुस्लिमवर बॉम्ब फेकल्याचा आरोप आहे. अशात आता अतिक आणि अशरफ यांच्या हत्येनंतर गुड्डू मुस्लिम पुन्हा एकदा चर्चेत आला.
हे वाचलं का?
गुड्डू मुस्लिमला नाशिकमधून अटक?
दरम्यान, सोशल मिडीयावर अतिक आणि अशरफच्या हत्येच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे 16 एप्रिलला अनेकांनी गुड्डू मुस्लिमला महाराष्ट्रातील नाशिक अटक केल्याचा दावा केला आहे. मात्र, हे वृत्त खोटं असल्याचं समोर आलं आहे. ‘आज तक’चे प्रतिनिधी दीपेश त्रिपाठी यांच्या वृत्तानुसार, नाशिकचे पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी गुड्डू मुस्लिमच्या अटकेचा साफ इन्कार केला आहे.
अंकुश शिंदे यांनी सांगितलं की, दिल्ली पोलिसांचं एक पथक वेलकम हॉटेलमध्ये काम करणाऱ्या वेटरची शस्त्रास्त्रांशी संबंधित एका प्रकरणात चौकशी करण्यासाठी आलं होतं. रात्री उशिरा चौकशी करून त्यांनी वेटरला सोडलं. एका गुंडाच्या मोबाईलवर या वेटरचा कॉल आला होता. वेटरनं सांगितलं की त्याने मिस्ड कॉल नंबरवर पुन्हा कॉल केला, त्यानंतर समोरच्या व्यक्तीने चुकून नंबर डायल केल्याचं सांगितलं. या चौकशीनंतर वेटरला सोडून देण्यात आलं. ही व्यक्ती गुड्डू मुस्लिम नव्हती. तसंच यूपी एसटीएफच्या कोणत्याही टीमने आतापर्यंत आमच्याशी संपर्क साधलेला नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.
ADVERTISEMENT
‘मेन बात ये है कि गुड्डू मुस्लिम…’ अतिकचे शेवटचे शब्द अन् थेट डोक्यात गोळी…
यापूर्वी 13 एप्रिल रोजी अतिकचा मुलगा असद आणि त्याचा सहकारी गुलाम यांच्या मृत्यूच्या दिवशीही गुड्डू मुस्लिमला पोलिसांनी घेरल्याच्या बातम्या आल्या होत्या. उत्तर प्रदेश स्पेशल टास्क फोर्सने गुड्डू मुस्लीमला घेरलं, असे दावे करण्यात आले. मात्र, उत्तरप्रदेशचे विशेष पोलीस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) प्रशांत कुमार यांनी पत्रकार परिषदेत अशा प्रकारच्या अफवांचं खंडन केलं. प्रशांत कुमार यांनी असे कोणतेही अपडेट नसल्याचे सांगितलं होतं.
ADVERTISEMENT
गुड्डूवर 5 लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. उमेश पाल हत्याकांडात गुड्डू सीसीटीव्ही फुटेजमध्ये बॉम्ब फेकताना दिसला होता. गुड्डू हा जुना रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याचे उत्तर प्रदेशातील सर्व माफियांशी संबंध असल्याचे सांगितले जाते. तसंच तो गोळी मारत नाही, तर तो बॉम्बफेक करून मारतो, असं सांगितलं जातं.लखनौच्या नाका भागात बॉम्बस्फोट करून एकाच्या हत्येप्रकरणी त्याला तुरुंगातही पाठवण्यात आले होते.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT