मित्राच्या बायकोचा अनैतिक संबंधास नकार, नराधमाने 2 वर्षांच्या चिमुरडीवर केला बलात्कार
Gujarat Crime News : गुजरातमधील भरूचमध्ये पतीच्या मित्राने दोन वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. महिलेने अनैतिक संबंधास नकार दिल्याचा बदला घेण्यासाठी आरोपीने हे कृत्य केल्याचे पोलिसांनी सांगितले.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मित्राच्या बायकोचा अनैतिक संबंधास नकार
नराधमाने 2 वर्षांच्या चिमुरडीवर केला बलात्कार
Gujarat Crime News : गुजरातमधील भरूच जिल्ह्यातून माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एका महिलेने अनैतिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याचा राग मनात धरून तिच्या पतीच्या मित्राने दोन वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. आरोपीने चॉकलेटचे आमिष दाखवून चिमुरडीला स्वतःच्या खोलीत नेले आणि तिच्यावर अत्याचार केला. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने महिलेचा नकार सहन न झाल्याने तिच्या निष्पाप मुलीला लक्ष्य केले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा : पुण्यात भरदिवसा रक्तरंजित थरार! कोर्टाबाहेर गोळीबार, तरुणावर कोयत्याने सपासप वार
अनैतिक संबंध ठेवण्यासाठी दबाव, पण महिलेने दिला नकार
या प्रकरणातील आरोपीचे नाव सुरेंद्रकुमार असून त्याचे वय 28 वर्षे आहे. तो पीडित चिमुरडीच्या वडिलांचा मित्र असल्याची माहिती समोर आली आहे. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी तिच्यावर अनैतिक संबंध ठेवण्यासाठी दबाव आणत होता. मात्र, महिलेने त्याच्या मागणीला वारंवार नकार दिला. त्यामुळे आरोपीने महिलेला फोन करून गंभीर परिणाम भोगण्याची धमकी दिली होती. महिलेने संबंध ठेवण्यास नकार दिल्याने तिचा बदला घेण्यासाठी आरोपीने तिच्या दोन वर्षांच्या मुलीला लक्ष्य करण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.
हेही वाचा : 'भांडणं थांबवा आणि...', सुप्रिया सुळेंची 'त्या' गोष्टीसाठी सरकारला हात जोडून विनंती!
दोन वर्षांच्या चिमुरडीला आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार
घटनेच्या दिवशी चिमुरडी घराच्या अंगणात खेळत होती. त्यावेळी आरोपी तिच्याजवळ गेला. त्याने तिला चॉकलेटचे आमिष दाखवून स्वतःच्या खोलीत नेले. त्यानंतर त्याने चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. या अत्याचारामुळे मुलीच्या गुप्तांगाला गंभीर दुखापत झाल्याचे आईने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. मुलीवर झालेल्या अत्याचाराची माहिती कुटुंबीयांना मिळाल्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेतली. त्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. दोन वर्षांच्या चिमुरडीला आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याच्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी आरोपी सुरेंद्रकुमार याच्याविरोधात बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायदा अर्थात पॉक्सो कायद्यातील संबंधित कलमांसह अन्य लागू कायद्यांनुसार गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली. अटकेनंतर त्याला भरूच येथील विशेष पॉक्सो न्यायालयात हजर करण्यात आले. या प्रकरणाच्या पुढील चौकशीसाठी आरोपीची पोलीस कोठडी मिळावी, यासाठी पोलिसांनी न्यायालयात प्रक्रिया सुरू केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून आरोपीने केलेल्या कृत्याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.
