भावाच्या प्रेयसीला दहाव्या मजल्यावरून दिले ढकलून, सगळी घटना सीसीटीव्हीत कैद
आपल्या भावाच्या माजी प्रेयसीला इन्स्टाग्रामवरून संपर्क साधून आधी घरी बोलवण्यात आले. त्यानंतर दोघातमध्ये वाद झाला आणि तरुणाने घरी आलेल्या तरुणीला दहाव्या मजल्यावरून थेट खाली फेकून दिले. ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून पोलिसांनी संबंधिताला ताब्यात घेतले आहे.
ADVERTISEMENT
Gujarat Crime News: गुजरातमधील सुरतमध्ये (Surat) एका महिलेची निर्घृणपणे हत्या (Women Murder) करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्या महिलेची इतक्या क्रूरपणे हत्या करण्यात आल्याने अनेकांना धक्का बसला आहे. सूरत शहरातील जहांगीरपुरा भागात राहणाऱ्या एका प्रियकराने आपल्या प्रेयसीला त्याच्या घरी भेटण्यासाठी बोलवले होते. त्यानंतर त्याने आपल्या प्रेयसीला थेट 10 व्या मजल्यावरून ढकलून देऊन तिची हत्या केली आहे. या सर्व घटनेचे सीसीटीव्ही फुटेज (CCTV) आता पोलिसांना मिळाले आहे.
ADVERTISEMENT
सीसीटीव्हीत सगळं कैद
पोलिसांनी या प्रकरणाची माहिती देताना सांगितले की, सीसीटीव्हीमध्ये लांब कुरळे केस असलेला एक व्यक्ती लिफ्टमध्ये असल्याचे दिसत आहे. त्याच्याबरोबर बुरखा घातलेली एक तरुणी दिसत आहे. ती दोघंही त्या लिफ्टमधून जात असल्याचेही दिसून येते. तर दुसऱ्या एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये मात्र एक धक्कादायक दृश्य दिसते. व्हिडीओमध्ये बुरखा घातलेली एक मुस्लिम मुलगी इमारतीच्या दहाव्या मजल्यावरून खाली पडल्याचे दिसून येते.
हे ही वाचा >> Amol Shinde: ‘पोलिसांना एवढंच म्हणालो, पोरगं मेलंय का तेवढं सांगा…’, अमोलच्या वडिलांची प्रतिक्रिया
भावाची प्रेयसी
सीसीटीव्ही फुटेजविषयी माहिती सांगताना पोलिसांनी सांगितले की, व्हिडीओमध्ये जी महिला दहाव्या मजल्यावरून खाली पडल्याचे दिसत आहे, तिचे नाव हबीबा बानो आहे. बुरखा घातलेली हबीबा बानो ही मुलगी जुनैद नूर मोहम्मदला भेटण्यासाठी आली होती. मात्र हबीबाचे अफेअर हे जुनैदच्या भावाबरोबर होते. त्या दोघांची एंगेजमेंटही झाली होती, मात्र हबीबाने जुबेरसोबत आपले संबंध तोडले होते.
हे वाचलं का?
इन्स्टाग्रामवर झाला वाद
ही घटना घडण्यापूर्वी आरोपी जुनैद नूर मोहम्मदने आपल्या भावाच्या पूर्वीच्या प्रेयसीला इन्स्टाग्रामवरून मेसेज करून तिच्याशी संपर्क साधला. त्यानंतर या दोघांचा कोणत्यातरी मुद्यावरून दोघांचा वाद झाला. त्या वादातूनच जुनैदने हबीबाला इमारतीच्या दहाव्या मजल्यावरून ढकलून दिल्याचे पोलिसांनी सांगितले. तिची हत्या करून झाल्यानंतर जुनेदने स्वतःला जखमी करून घेतले होते.
मुलीने केला आधी वार
हबीबा बानोच्या मृत्यूनंतर आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यावेळी त्याने सांगितले की, हबीबाने माझ्यावर चाकूने हल्ला केला त्यामध्ये मी जखमी झालो. ती मला भेटायला आली होती, मात्र तिनेच माझ्या खोलीचा दरवाजा बंद करत असताना तिने माझ्या पाठीवर वार केला. यावेळी तिने माझ्या पाठीवर व गळ्यावरही वार करून मला मारण्याचा प्रचत्न केल्याचे जुनैदने सांगितले. त्यानंतर तिने स्वतःच इमारतीवरून उडी मारल्याचेही त्याने सांगितले.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Security Breach in Lok Sabha: लातूरच्या अमोल शिंदेला ‘ती’ तरूणी कशी भेटली?, वाचा Inside Story
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT