अर्धनग्न अवस्थेत मृतदेह, चेहराही जाळला, महिलेची केली क्रूर हत्या

मुंबई तक

ADVERTISEMENT

half-naked and partially burnt body of a woman was found in Gwalior, Madhya Pradesh
half-naked and partially burnt body of a woman was found in Gwalior, Madhya Pradesh
social share
google news

MP Crime: मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये एका महिलेचा अर्धनग्न आणि अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह (Dead body) आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मृतदेहाजवळ दारूचे रिकामी बाटली आणि सुसाईड नोटही (Suicide Note) सापडली आहे. नवीन जिल्हा न्यायालयाच्या इमारतीमागे ही घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. ही हत्या करण्यात आली आहे की, आत्महत्या केली आहे त्याचा शोध पोलीस घेत आहेत.

ADVERTISEMENT

अर्धनग्न अवस्थेत मृतदेह

शनिवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालय रोडवरील नवीन जिल्हा न्यायालयाच्या इमारतीमागील मोकळ्या जागेत एका महिलेचा मृतदेह पडल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली होती. त्यानंतर विद्यापीठ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी पोलिसांना महिलेचा अर्धनग्न अवस्थेत पडलेला मृतदेह आढळून आला.

हे ही वाचा >> Sindhudurg : पुण्यातील 6 विद्यार्थी देवगड समुद्रात बुडाले, नेमकं काय घडलं?

सुसाईड नोटमुळे खळबळ

पोलिसांनी सांगितले की, चेहऱ्यापासून पोटापर्यंत महिलेचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह सापडला आहे. तर त्या मृतदेहाजवळ 3 रिकामे दारूच्या बाटल्याही सापडल्या आहेत. त्याचबरोबर सुसाईड नोटही आढळून आल्या आहेत. मृतदेहाजवळ महिलेचे कपडेही सापडले असून ही हत्या आहे की आत्महत्या आहे हे आता तपासानंतरच स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. मृतदेह आढळून आल्यानंतर तात्काळ फॉरेन्सिक टीम, सायबर टीम आणि ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते.

हे वाचलं का?

बलात्कार करून हत्या?

अतिरिक्त पोलीस अधीक्षक हृषिकेश मीना यांनी सांगितले की, 35 वर्षीय महिलेचा मृतदेह दारू टाकून जळालेल्या अवस्थेत सापडला आहे. तर पोलिसांनी दुसरीही शक्यता वर्तवली आहे की, महिलेवर बलात्कारही झाल्याची शक्यता आहे. बलात्कार करून तिची हत्या केल्याचा दाट संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. चेहरा जळाल्याने तिची ओळख पटवणे अवघड झाले आहे.

हे ही वाचा >> Beed Crime: दगडाने डोके ठेचून हत्या, पाच मामांनी मिळून भाच्याला का संपवलं?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT