पळून जाताना नवरीसोबत प्रियकराला ग्रामस्थांनी पकडलं, मग नवऱ्याने…

मुंबई तक

ADVERTISEMENT

husband help wife and her boyfriend to Escape for marrigae jharkhand palamu story
husband help wife and her boyfriend to Escape for marrigae jharkhand palamu story
social share
google news

Husband Help wife and her boyfriend to Escape : देशभरात अनैतिक संबंधाच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. या वाढत्या घटनांमुळे गुन्ह्याचे प्रमाण देखील वाढले आहे.अशात एक वेगळीच घटना समोर आली आहे. या घटनेत 20 दिवसांपूर्वी लग्न झालेली नवीन नवरीने प्रियकरासोबत पळ काढल्याची घटना घडली होती. या दरम्यान ग्रामस्थांनी तिला पकडून कुटुंबियांच्या हवाली केले होते. यावेळी नवऱ्याने पत्नीच्या प्रेमाला पाठिंबा दर्शवत पत्नीचा हात प्रियकराच्या हातात देत त्यांना पळून जाण्यास मदत केली. या घटनेची आता एकच चर्चा रंगली होती. (husband help wife and her boyfriend to Escape for marrigae jharkhand palamu story)

पलामु (palamu) जिल्ह्याच्या किला गावातील सनोज कुमारचे प्रियंका कुमारी सोबत गेल्या महिन्याच्या 10 मे तारखेला धुमधडाक्यात लग्न पार पडले होते. या लग्नानंतर नवरी प्रियंका खुप उदास असायची. ती या लग्नापासून नाखुश असल्याचे सनोजला जाणवायचे. या दरम्यान ती मोबाईवर कोणासोबत तरी बोलायची. काही दिवसानंतर पती सनोज कुमारला पत्नी प्रियंका प्रियकरासोबत (Boy friend) बोलत असल्याची माहिती मिळाली होती. प्रियंकाचे तिच्याच गावातील तरूण जितेंद्र सोबत गेल्या 10 वर्षापासून प्रेम संबंध (Relationship) होते. मात्र जात वेगळी असल्या कारणाने तिला लग्न करता आले नव्हते.

हे ही वाचा : Sex Racket: ‘डार्क रुम’मध्ये ‘डर्टी पिक्चर’.. कुठे सुरू होतं खुलेआम सेक्स रॅकेट?

या दरम्यान सोमवारी जितेंद्र मनातू पोहोचला आणि त्याने प्रियंकाला पळवून नेण्याचा प्रयत्न केला.मात्र ग्रामस्थांनी मिळून प्रियंका आणि तिच्या प्रियकराला पकडून कुटुंबियांच्या हवाली केले. यानंतर सनोजने या संपूर्ण घटनेची माहिती पोलिसांना (police) दिली होती. पोलिसांनी मुलीच्या कुटूंबियांना या संपूर्ण घटनेची माहिती देण्यासाठी बोलावण धा़डलं, मात्र प्रियंकाचे कुटुंबिय पोलीस ठाण्यात आलेच नाही. शेवटी सनोजने पत्नीच्या प्रेमाला पाठिंबा देत प्रियंकाचा हात प्रियकर जितेंद्रच्या हातात देत पळून जाण्यास परवानगी दिली. या घटनेची आता एकच चर्चा रंगली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा : ‘ते’ हसणं साक्षीसाठी ठरलं जीवघेणं; साहिलने का केला होता तिघांच्या हत्येचा प्लान?

    follow whatsapp

    ADVERTISEMENT