लग्नाला आलेल्या 113 पाहुण्यांचा मृत्यू, नवरदेव-नवरी वाचले; काय घडलं?

ADVERTISEMENT

Iraq wedding ceremony fire started by firecrackers during 113 people, including their relatives burnt death in 150 injured.
Iraq wedding ceremony fire started by firecrackers during 113 people, including their relatives burnt death in 150 injured.
social share
google news

Iraq Wedding: विवाह समारंभ हा दोघांचा होत असला तरी त्यानिमित्ताने अनेक नातंसंबंध जोडले जातात. असाच एक विवाह झाला खरा मात्र एक दुर्घटना (Accident) घडली आणि अनेक नात्यागोत्यांच्या संसारांची राखरांगोळी झाली. लग्न समारंभातच दुर्घटना घडली आणि 113 लोकांचा मृत्यू झाला, मात्र या दुर्घटनेत वधू-वर दोघांचाही जीव वाचला आहे. ही दोघंही ज्या दरवाजातून शंभर पाहुणे सहीसलामत बाहेर पडले त्यांच्याबरोबरच ही दोघंही बाहेर पडले. हा लग्न समारंभ झाला होता, इराकमध्ये. याच लग्नात 130 जण आणखी गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. (iraq wedding fire 113 relatives death wife husband injured)

फटाक्यांमुळे आग पसरली

हनीन आणि रेवान यांच्या विवाहसमारंभामध्ये ही दुर्घटना घडल्यामुळे अनेकांना या दोघांचाही मृत्यू झाला असं वाटत होते. त्यानंतर मात्र ही दोघंही एका रुग्णालयात दाखल झाल्याचे समजले. लग्नात ही आग फटाक्यांमुळे लागली असल्याचे सांगितले जात आहे. आगीनंतरचा वधू-वर दोघंही घाबरल्याचे दिसत आहे. त्यांचा एक व्हिडीओही एक व्हायरल झाला आहे. इमारतीतील भिंतीनाही आग लागली असून छत खाली कोसळल्याचेही दिसत आहे. तर हे जोडपे आपला जीव वाचवण्यासाठी बाहेर पळून जात असल्याचेही दिसत आहे.

हे ही वाचा >>Gunaratna Sadavarte : “संघाची पिलावळ… भाजपचा हात”, काँग्रेस नेत्याचा थेट ‘वार’

लग्न समारंभ नव्हे स्मशान

या दुर्घटनेत जखमी झालेल्यांना शहरातील अनेक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र हमदानिया हा जिल्हा आयएसआयएसच्या ताब्यात होता. इसिसमुळे जेवढे या लोकांचे नुकसान झाले नाही तेवढे या लग्नाने केले असल्याचे मत एका मृतांच्या नातेवाईकांने व्यक्त केले आहे. आम्ही लग्नाला आलो नव्हतो तर आमच्या वाट्याला एक नरक आला असं मत मुलगी आणि तीन नातवंडाचा मृत्यू झालेल्या आजोबांनी व्यक्त केले आहे. यामध्ये आठ महिन्याचेही एक बाळ होते. तर दुसऱ्या एका पाहुण्याने सांगितले की, माझी मुलगी, तिचा नवरा आणि त्यांचे तीन वर्षाचे मूलही मी गमावले आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हॉलचा मालकच जबाबदार

ही दुर्घटना घडल्यानंतर तेथील प्रशासनाने त्या हॉलच्या मालकासह 14 लोकांना ताब्यात घेतले आहे. तर ज्याचे लग्न होते, त्या व्यक्तिच्या वडिलांनी ही आग लागण्यास हॉलचा मालकच जबाबदार आहे. त्यामुळे आता येथील नागरिकांनी येथील हॉटेल, शाळा आणि रुग्णालयांचे निरीक्षण करणे गरजेचे आहे.

बाकीचे आगीच्या भक्ष्यस्थानी

लग्नाला जे पाहुणे आले होते, त्यांचे म्हणणे आहे की, आग लागल्यानंतर ती विझवण्याची कोणतीही साधने या ठिकाणी नव्हती. हॉलमध्ये काही दरवाजे होते. त्या दरवाजातून काही लोकं पळून गेली म्हणून वाचली आहेत. या आगीतून वाचलेला 34 वर्षाचा इमाद योहाना सांगतो की, आगीने एवढे रौद्ररुप धारण केले होते की, त्यातून बाहेर पडणे सहज शक्य नव्हते,त्यामुळे जे धाडसाने त्यातून बाहेर पडले तेवढेच वाचले आहेत, बाकी सगळे आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आहेत.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Kiran Samant : उदय सामंतांच्या भावाच्या स्टेट्सला ठाकरेंची मशाल, कारण काय?

मदतीसाठी अमेरिका सरसावली

अल ताहिरा चर्चमधील एका फादरने या दुर्घटनेविषयी दुःख व्यक्त करताना सांगितले की, हे दुःख एका कुटुंबाचे नाही. तर त्यांच्या दुःखात सारं इराक शोख व्यक्त करत आहे.यावेळी त्यांनी भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे अशा घटना घडल्या आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी. तर दुसरीकडे आता अमेरिकेने मदत करण्यासाठी इराकबरोबर चर्चा सुरु केली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT