जयश्रीचा ‘लग्न घोटाळा’, 35 वर्षीय महिला करायची लग्न अन् 5 दिवसातच…

मुंबई तक

ADVERTISEMENT

junnar 35 year old woman fake bride marraige lakh of rupees crime news police arrest
junnar 35 year old woman fake bride marraige lakh of rupees crime news police arrest
social share
google news

Marathi News: स्मिता शिंदे, नारायणगाव, जुन्नर: जुन्नर (Junnar) तालुक्यातील गुंजाळवाडी व खोडद येथील शेतकरी कुटुंबातील दोन तरुणांबरोबर दीड महिन्यात एकाच मुलीचं नाव बदलून विवाह (Marriage) लावून दागिने, रोख रक्कम असा सुमारे साडेचार लाख रुपयांचा मुद्देमाल घेऊन पसार झालेल्या टोळीतील बनावट नवरी मुलीसह 6 जणांच्या टोळीला नारायणगाव पोलिसांनी मोठ्या शिताफिने अटक करून जेरबंद केलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे तालुक्यात या टोळीने 20 पेक्षा जास्त मुलांना अशाच पद्धतीने गंडा घातल्याची माहिती समोर येत आहे. (junnar 35 year old woman fake bride marriage lakh of rupees crime news police arrest)

ADVERTISEMENT

याप्रकरणी बनावट नवरी जयश्री काळू घोटाळे (वय-35 राहणार मुरंबी, शिरजगाव तालुका त्र्यंबकेश्वर,जिल्हा नाशिक), बनावट मावशी मीरा बन्सी विसलकर (वय-39), तुकाराम भाऊराव मांगते (वय-23, दोघेही राहणार अंबुजा वाडी, इगतपुरी घोटी, जिल्हा नाशिक), बाळू भिकाजी काळे (वय- 46 राहणार बोटा, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर), एजंट शिवाजी शंकर कुरकुटे ( वय 64, राहणार- कुरकुटेवाडी, बोटा, तालुका संगमनेर जिल्हा नगर), बाळू गुलाब सरवदे (वय 41,राहणार गुंजाळवाडी, तालुका जुन्नर जिल्हा पुणे) या आरोपींना पोलिसांनी मंगळवारी अटक केली आहे.

महिला कशी ओढायची तरूणांना आपल्या जाळ्यात?

आरोपींनी संगनमत करून जयश्री काळू घोटाळे हिचा सागर प्रभाकर वायकर( वय 23 राहणार गुंजाळवाडी, तालुका जुन्नर) यांच्याशी 10 मे 2023 रोजी जुन्नर येथे तर हरीश बाळशिराम गायकवाड (वय 35 राहणार खोडद तालुका जुन्नर जिल्हा पुणे ) यांच्याशी 28 मे 2023 रोजी आळंदीत विवाह लावून दिला होता.

हे वाचलं का?

सागर वायकर यांच्याशी विवाह लावताना नवरी मुलगी जयश्री काळू घोटाळे हिचे नाव संध्या विलास बदादे (वय 23 ) असे तर हरीश गायकवाड यांचेशी लग्न लावताना अश्विनी रामदास गवरी (वय 25) असे सांगण्यात आले होते.

हे ही वाचा >> Mumbai : “ती म्हणायची सुरक्षारक्षकाची भीती वाटते”, ‘त्या’ तरुणीने वडिलांना काय सांगितलं होतं?

विवाह जमवण्यासाठी या टोळीने वायकर यांच्याकडून एक लाख तीस हजार रुपये रोख तर हरीश गायकवाड यांच्याकडून एक लाख साठ हजार रुपये रोख घेतले होते. लग्न लावल्यानंतर बनावट नवरी मुलगी धार्मिक विधीसाठी चार ते पाच दिवस सासरी राहत असे. त्यानंतर बनावट मावशी मीरा बन्सी विसलकर ही नवरी मुलंगी माहेरी घेऊन जात असे. त्यानंतर नवरी मुलगी दागिन्यास फरार होत असे.

ADVERTISEMENT

याबाबतीत तक्रार सागर वायकर व हरिष गायकवाड यांनी नारायणगाव पोलीस ठाण्यात 2 जून 2023 रोजी दिली होती. याच तक्रारीच्या आधारे पोलिसांनी बनवाट नवरी मुलगी आणि इतर सहआरोपींच्या मुसक्या आवळल्या.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> ‘व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस’वरून कोल्हापुरात ठिणगी, दगडफेकीनंतर पोलिसांचा लाठीचार्ज

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, याप्रकारे आळेफाटा येथील देखील एका तरुणाची अशाच पद्धतीने फसवणूक झाल्याचं आता समोर आलं आहे. याशिवाय आणखी किती तरुणांना या बनावट नवरीने गंडा घातलाय याचा देखील आता पोलीस तपास करत आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT